TRENDING:

EX गर्लफ्रेंडवर 'काळी जादू' केल्याचा आरोप, शेफालीच्या मृत्यूची भविष्यवाणी करणारा पारस छाब्रा कोण?

Last Updated:
Paras Chhabra Birthday: टीव्ही अभिनेता आणि रिअॅलिटी शोमधून घराघरात पोहोचलेला चेहरा म्हणजे पारस छाब्रा. त्याने आपल्या मेहनतीच्या जोरावर टीव्ही इंडस्ट्रीत नाव कमावले.
advertisement
1/7
EXगर्लफ्रेंडवर 'काळी जादू'चा आरोप,शेफालीच्या मृत्यूची भविष्यवाणी करणारा पारस कोण
टीव्ही अभिनेता आणि रिअॅलिटी शोमधून घराघरात पोहोचलेला चेहरा म्हणजे पारस छाब्रा. त्याने आपल्या मेहनतीच्या जोरावर टीव्ही इंडस्ट्रीत नाव कमावले. तो त्याचा 34 वा वाढदिवस साजरा करत आहे. 11 जुलैला त्याचा वाढदिवस असतो. याच निमित्ताने त्याच्याविषयी काही खास गोष्टी जाणून घेऊया.
advertisement
2/7
पारसने 2012 मध्ये एमटीव्ही स्प्लिट्सव्हिला 5 जिंकून आपलं करिअर सुरू केलं. यानंतर नच बलिये 6, स्प्लिट्सव्हिला 8 आणि बिग बॉस 13 सारख्या मोठ्या शोमध्ये सहभाग घेतला. बिग बॉस 13 मध्ये तर त्याने सहावं स्थान मिळवत प्रेक्षकांची मने जिंकली.
advertisement
3/7
याशिवाय बधो बहू, अघोरी, कलीरें, कर्ण संगिनी यांसारख्या टीव्ही शोमध्येही त्याने काम केलं आहे. विघ्नहर्ता गणेश या शोमध्ये त्याने साकारलेली रावण ही भूमिका विशेष चर्चेत राहिली.
advertisement
4/7
शेफाली जरीवाल्याच्या मृत्यूची भविष्यवाणी करणाऱ्या पारसने अलीकडे आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत एक धक्कादायक खुलासा केला. त्याच्या या खुलाश्याने सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे.
advertisement
5/7
सध्या पारस ‘पारस आब्रा का डाबरा’ नावाचा स्वतःचा यूट्यूब पॉडकास्ट चालवतो. या पॉडकास्टमध्ये तो टीव्ही कलाकारांच्या मुलाखती घेतो आणि बिग बॉससारख्या शोच्या पडद्यामागच्या गोष्टी प्रेक्षकांसमोर आणतो. पण अलीकडे त्याच्या एका एपिसोडमध्ये पारसने वैयक्तिक आयुष्याबाबत एक धक्कादायक गोष्ट सांगितली.
advertisement
6/7
पारसने असा दावा केला की, त्याच्या एका माजी प्रेयसीने त्याच्यावर ‘काळी जादू’ केली होती. तिचा धर्म वेगळा होता, असे तो म्हणाला. ती सात दिवस पाणी फुंकून पारसला पाजत होती. एका दिवशी तिने दिलेला चहा प्याल्यानंतर पारस खूप झोपून गेला आणि त्याला विचित्र, भयावह स्वप्ने पडायला लागली.
advertisement
7/7
पारस म्हणाला, “ती गोष्ट माझ्या आयुष्यातील विचित्र आणि भयंकर अनुभवांपैकी एक होती. मला वाटायचं, हे नक्की काय चाललं आहे? मी आधी इतका थकलेला कधीच नव्हतो.” पारसने त्या माजी प्रेयसीचे नाव घेतले नाही, पण याआधी त्याचं नाव आंक्षा पुरी आणि माहिरा शर्माशी जोडले गेले आहे. आंक्षासोबतचं त्याचं नातं वाईट पद्धतीने संपलं होतं. त्यानंतर बिग बॉसच्या घरात त्याची आणि माहिरा शर्माची जवळीक झाली होती.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
EX गर्लफ्रेंडवर 'काळी जादू' केल्याचा आरोप, शेफालीच्या मृत्यूची भविष्यवाणी करणारा पारस छाब्रा कोण?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल