Prajakta Mali : 'मला खूप जणांनी छळलं', प्राजक्ता माळीने सांगितलं 'फुलवंती'साठी काय काय सहन केलं?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Prajakta Mali on Phullwanti Struggle : महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री प्राजक्ता माळी हास्यजत्रेच्या नव्या सीझनमधून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. प्राजक्ताचा फुलवंती हा सिनेमा नुकताच रिलीज झाला. या सिनेमाच्या माध्यमातून प्राजक्ताने निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवलं. अभिनेत्री असताना निर्माती होणं हे काही प्राजक्तासाठी सोपं नव्हतं. फुलवंती सिनेमा साकारण्यासाठी प्राजक्ताने खूप काही सहन केलं आहे. एका मुलाखतीत बोलताना तिने मला लोकांनी खूप छळलं, मी बॉस असणं अनेकांना आवडलं नाही, अशी खंत व्यक्त केली. प्राजक्ता नेमकं काय म्हणाली पाहूयात.
advertisement
1/7

राजश्री मराठीशी बोलताना प्राजक्ता म्हणाली, या चित्रपटामुळे मला निर्माती म्हणून टॅग मिळाला. निर्माती म्हणून पहिला प्रोजेक्ट आणि तोही ‘फुलवंती’चा मिळाला, त्यामुळे मी देवाची ऋणी राहीन.”
advertisement
2/7
‘फुलवंती’ घेतलेल्या मेहनतीबद्दल बोलताना प्राजक्ता म्हणाली, “मी या सिनेमासाठी खूप मेहनत घेतली आहे. फुलवंती सिनेमासाठी लागणारे पैसे कधीही येतील यामुळे मी 2023मध्ये एकही बाहेरचा सिनेमा केला नाही."
advertisement
3/7
"2023मध्ये मी 6-7 सिनेमांना नकार दिला. लंडनच्या फिल्म्स नाकारल्या. माझ्या आयुष्यातील ही 2 वर्षे मी फक्त ‘फुलवंती’साठी बहाल केली."
advertisement
4/7
इतकंच नाही तर प्राजक्ता पुढे म्हणाली, "मी 7-8 महिने एकही कार्यक्रम केला नव्हता. ‘फुलवंती’ चालू असताना मी पाच महिने पुण्याला माझ्या घरीसुद्धा गेले नाही."
advertisement
5/7
"अथक मेहनत, सातत्य व संयम या गोष्टी होत्या. मी वयानं लहान आहे, त्यात मुलगी आहे. याबरोबरच, तुम्ही मोठ्या होताय ना आता, हे पाहून लोकांनी मला किती छळलं.ही मुलगी आपल्याला मागे टाकून पुढे जाणार, याचा बहुतांश जणांना त्रास झाला."
advertisement
6/7
"हे सगळं मला कळत होतं. पण मी बोलू शकत नव्हते. कारण- ते माझ्याच टीमचा भाग होते. मी त्यांची म्होरक्या होते. त्यांनी माझ्याकडे शेवटपर्यंत असलं पाहिजे, हे जाणून मला गोडच बोलायला लागायचं. त्यामुळे जास्त त्रास झाला."
advertisement
7/7
"कदाचित मी आता पन्नाशीची असते, तर मला कमी त्रास झाला असता. माझ्या पन्नाशीला मला कमी त्रास होईल. तेव्हा मी घोषित बॉस असेन. आता मी बॉस असणं खूप जणांना खुपलं. माझं म्हणणं शेवटचं म्हणणं आहे, हे खुपायचं."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Prajakta Mali : 'मला खूप जणांनी छळलं', प्राजक्ता माळीने सांगितलं 'फुलवंती'साठी काय काय सहन केलं?