'खोलीत बंद करुन त्याने माझ्यासोबत...' प्रीती झिंटाचे या व्यक्तीने केलेले हालहाल, भीतीने थरथर कापत होती अभिनेत्री
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Preity Zinta : बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटाचे एका व्यक्तीने हालहाल केले होते. त्यावेळी अभिनेत्री भीतीने थरथर कापत होती.
advertisement
1/7

बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा आपल्या अभिनय, सौंदर्य आणि निखळ हास्यामुळे नव्हे तर वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असते. प्रीती झिंटा आज इंडस्ट्रीपासून दूर असून संसारात रमली असली तरी एकेकाळी बी-टाउनमध्ये तिच्या अफेअरच्या चर्चा रंगायच्या.
advertisement
2/7
मीडिया रिपोर्टनुसार, प्रीती झिंटाचं नाव लग्नाआधी अनेक बॉलिवूड अभिनेत्यांसोबत जोडलं गेलं आहे. अभिषेक बच्चन आणि प्रीती झिंटा यांच्या अफेअरची चर्चा मात्र सर्वाधिक काळ चालली. पण दोघांनीही आपलं नातं कधीच जगजाहीर केलं नव्हतं.
advertisement
3/7
प्रीती झिंटाच्या आयुष्यातील सर्वात चर्चित चॅप्टर उद्योगपती नेस वाडिया (Ness Wadia) यांच्यासोबतचं तिचं रिलेशन होतं. दोघांना अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आलं. त्यांनी आपल्या नात्याची जाहीररित्या कबुलीदेखील दिली होती. दोघे लग्न करणार असल्याच्याही चर्चा होत्या.
advertisement
4/7
मीडिया रिपोर्ट्सनुसार, एका IPL मॅचदरम्यान प्रीती झिंटा आणि नेस वाडिया यांच्यात कडाक्याचं भांडण झालं. प्रकरण ऐवढं तापलं होतं की प्रीतीने पोलिसांत तक्रार दाखल केली. या तक्रारीत प्रीतीने नेस वाडिया विरोधात शिवीगाळ, धमकावणे, छेडछाड, पेटती सिगारेट अंगावर फेकणे, खोलीत बंद करुन ठेवणे, असे गंभीर आरोप केले होते. त्यावेळी प्रीती झिंटा भीतीने थरथर कापत होती.
advertisement
5/7
काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, प्रीती झिंटा आणि नेस वाडिया यांच्या विभक्त होण्यामागे उद्योगपतीच्या आईचा विरोध हेदेखील कारण आहे.
advertisement
6/7
प्रीती झिंटा अखेर फेब्रुवारी 2016 मध्ये अमेरिकेतली जीन गुडइनफ यांच्यासोबत विवाहबंधनात अडकली. लग्नानंतर प्रीती झिंटा आपल्या पतीसोबत लॉस एन्जेलिसमध्ये स्थायिक झाली. आजच्या घडीला दोन मुलांसोबत वेळ घालवताना ती दिसते.
advertisement
7/7
प्रीती झिंटाने 'दिल से' या चित्रपटाच्या माध्यमातून 1998 मध्ये हिंदी मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं होतं. तिच्या दिल चाहता है, कल होना हो आणि सलाम नसस्ते या गाजलेल्या फिल्म आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'खोलीत बंद करुन त्याने माझ्यासोबत...' प्रीती झिंटाचे या व्यक्तीने केलेले हालहाल, भीतीने थरथर कापत होती अभिनेत्री