Priya Marathe Networth: प्रिया मराठेने मागे सोडली इतक्या कोटींची संपत्ती, आकडा थक्क करणारा!
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Priya Marathe Networth: अभिनेत्री प्रिया मराठे हिचं निधन झाल्याने सगळ्यांना मोठा धक्का बसला आहे. केवळ मालिकांमधील पात्रांमुळेच नव्हे, तर तिच्या साध्या आणि मनमोकळ्या स्वभावामुळे ती प्रेक्षकांच्या हृदयात कायमची घर करून गेली होती.
advertisement
1/7

अभिनेत्री प्रिया मराठे हिचं निधन झाल्याने सगळ्यांना मोठा धक्का बसला आहे. केवळ मालिकांमधील पात्रांमुळेच नव्हे, तर तिच्या साध्या आणि मनमोकळ्या स्वभावामुळे ती प्रेक्षकांच्या हृदयात कायमची घर करून गेली होती.
advertisement
2/7
गेल्या काही वर्षांपासून प्रिया मराठे कॅन्सरशी झुंज देत होती. मात्र अखेर 31 ऑगस्ट रोजी तिची ही झुंज अपयशी ठरली आणि तिने जगाचा निरोप घेतला. प्रिया जाताना किती संपत्ती मागे ठेवून गेली याविषयी जाणून घेऊया.
advertisement
3/7
प्रियाने या सुखांनो या, चार दिवस सासूचे, तू तिथं मी, ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण, येऊ कशी कशी मी नांदायला अशा गाजलेल्या मालिकांमधून अभिनय केला. छोट्या पडद्यावर झळकतानाच तिने हिंदी मालिका पवित्र रिश्तामधूनही आपली ओळख निर्माण केली. प्रिया केवळ मालिकांपुरती मर्यादित राहिली नाही, तर स्टेज शो, जाहिराती आणि काही चित्रपटांतूनही तिने आपली उपस्थिती दर्शवली.
advertisement
4/7
मिळालेल्या माहितीनुसार अंदाजे, प्रिया अभिनय आणि इतर प्रोजेक्ट्समधून महिन्याला सरासरी 1 ते 2 लाख रुपये कमवत असे. तिची एकूण संपत्ती 1 ते 2 कोटींच्या घरात असल्याचं सांगितलं जातं.
advertisement
5/7
अभिनयासोबतच तिला बिझनेसमध्येही रस होता. मुंबईत मीरा रोडमधील एका कॅफेची ती मालकीण होती. तिच्याकडे टोयोटा फॉर्च्युनरसारखी आलिशान कार होती, जी तिच्या खूप आवडीची होती.
advertisement
6/7
प्रियाच्या जाण्यानंतर तिच्या सहकलाकारांनी, मित्रांनी आणि चाहत्यांनी सोशल मीडियावरून शोक व्यक्त केला आहे. अनेकांनी तिचे जुने फोटो शेअर करून आठवणींना उजाळा दिला आहे.
advertisement
7/7
दरम्यान, प्रिया मराठेची ओळख एक अष्टपैलू अभिनेत्री म्हणून होती, जिने आपल्या कठोर परिश्रमाने आणि प्रतिभेने मनोरंजन विश्वात आपले स्थान निर्माण केलं होतं. मात्र आता तिच्या जाण्याने मनोरंजन विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Priya Marathe Networth: प्रिया मराठेने मागे सोडली इतक्या कोटींची संपत्ती, आकडा थक्क करणारा!