TRENDING:

मृत्यूपूर्वी पूर्णपणे खचली होती प्रिया मराठे, निधनाच्या 5 महिन्यांनी प्रार्थना बेहेरंने सांगितली अभिनेत्रीच्या मनातली भीती

Last Updated:
Prarthana Behere on Priya Marathe Death: अभिनेत्री प्रिया मराठेचं ३१ ऑगस्ट २०२५ रोजी कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने निधन झालं. पण प्रियाच्या जाण्याने केवळ एक अभिनेत्री नाही, तर प्रार्थनाचं एक मोठं स्वप्नही कायमचं अधूरं राहिलं आहे.
advertisement
1/8
प्रार्थना बेहेरंने सांगितली मृत्यूपूर्वीची प्रिया मराठेच्या मनातली 'ती' भीती
काही जखमा अशा असतात ज्या काळाच्या ओघात भरून निघत नाहीत, उलट त्या अधिक गडद होत जातात. मराठी चित्रपटसृष्टीतील लाडकी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे सध्या अशाच एका भावनिक वादळातून जात आहे.
advertisement
2/8
जिवाभावाची मैत्रीण, दिवंगत अभिनेत्री प्रिया मराठेचं ३१ ऑगस्ट २०२५ रोजी कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने आजाराने निधन झालं. पण प्रियाच्या जाण्याने केवळ एक अभिनेत्री नाही, तर प्रार्थनाचं एक मोठं स्वप्नही कायमचं अधूरं राहिलं आहे.
advertisement
3/8
प्रार्थना बेहेरेसाठी २०२५ हे वर्ष एखाद्या भयानक स्वप्नासारखं ठरलं. 'आरपार'ला दिलेल्या एका मुलाखतीत प्रार्थनाने आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. ती म्हणाली, "हे वर्ष माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट वर्ष होतं. वर्षाच्या सुरुवातीलाच भावाचं निधन झालं, पाठोपाठ आईसारख्या असलेल्या मामीला कॅन्सरने हिरावून नेलं."
advertisement
4/8
प्रार्थना पुढे म्हणाली, "माझ्या पायाचं ऑपरेशन झालं आणि ज्या दिवशी शस्त्रक्रिया होती, त्याच दिवशी मामी गेली. या धक्क्यातून सावरते न सावरते तोच माझी पहिली मैत्रीण प्रिया गेली आणि त्यानंतर काही दिवसांतच माझ्या बाबांनीही जगाचा निरोप घेतला." अवघ्या काही महिन्यांत आपल्या जवळची सर्व माणसं गमावल्याचं दुःख प्रार्थनाच्या बोलण्यातून स्पष्ट जाणवत होतं.
advertisement
5/8
प्रार्थना आणि प्रिया यांची मैत्री 'पवित्र रिश्ता'च्या सेटवर झाली होती. तिथेच या दोघींनी मिळून एक स्वप्न पाहिलं होतं. प्रार्थनाला भविष्यात एक चित्रपट दिग्दर्शित करायचा होता आणि त्या चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून तिला प्रियालाच कास्ट करायचं होतं.
advertisement
6/8
प्रार्थना सांगते, "मी तिला खूप आधी सांगितलं होतं की, जेव्हा मी दिग्दर्शन करेन तेव्हा तूच माझी हिरोईन असशील. मध्यंतरी ती कॅन्सरमधून बरी झाली तेव्हा आम्ही पुन्हा कामाबद्दल बोललो होतो. तिला एक नवीन मालिकाही मिळाली होती. पण पुन्हा नियतीने फासा पलटला. आज जर मला जगातील सर्वोच्च पुरस्कार मिळाला, तरीही तो आनंद साजरा करण्यासाठी माझ्याकडे प्रिया किंवा माझे बाबा नाहीयेत."
advertisement
7/8
मुलाखती दरम्यान प्रार्थनाने एक अत्यंत हृदयद्रावक आठवण सांगितली. आजारपणामुळे काही काळ अभिनयापासून दूर राहिलेली प्रिया मनातून खूप खचली होती. तिने एकदा प्रार्थनाला विचारलं होतं, "प्रार्थना, लोक मला विसरलेत का ग? मी काय करतेय, कुठे आहे, यात आता कोणालाच रस उरलेला नाहीये का?"
advertisement
8/8
प्रियाच्या निधनानंतर प्रार्थनाने तिचा एक फोटो शेअर केला, ज्यावर लाखो लाईक्स आणि कमेंट्स आल्या. ते पाहून प्रार्थना म्हणाली, "जेव्हा प्रिया हयात होती, तेव्हा लोकांनी तिला हे प्रेम दाखवलं असतं तर तिला किती बरं वाटलं असतं. ती असताना तिच्या चाहत्यांनी तिला विसरल्याची भावना तिच्या मनात होती. आता ती गेल्यावर रडून किंवा मुलाखती देऊन मला प्रसिद्धी मिळवायची नाहीये, कारण आमचं नातं काय होतं हे फक्त आम्हालाच ठाऊक होतं."<span style="font-size: 20px;"> </span>
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
मृत्यूपूर्वी पूर्णपणे खचली होती प्रिया मराठे, निधनाच्या 5 महिन्यांनी प्रार्थना बेहेरंने सांगितली अभिनेत्रीच्या मनातली भीती
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल