TRENDING:

वेगळा देश, वेगळा धर्म, वयात अंतर; हे खूप वेदनादायी! निक जोनाससोबत घटस्फोटाबाबत प्रियांका चोप्रा स्पष्टच बोलली

Last Updated:
Priyanka Chopra Nick Jonas Divorce : वाराणसी फिल्म्समधून प्रियांका चोप्रा भारतीय सिनेसृष्टीत कमबॅक करत आहे, याचदरम्यान एका मुलाखतीत तिने निक जोनासशी घटस्फोटाबाबतही सांगितलं आहे.
advertisement
1/5
वयात अंतर, हे खूप वेदनादायी! निकसोबत घटस्फोटाबाबत प्रियांका चोप्रा स्पष्टच बोलली
अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि सिंगर निक जोनास यांच्या लग्नाला 8 वर्षे झाली. तरी त्यांच्या घटस्फोटांबाबत सतत चर्चा होत असते. सध्या प्रियांका 'वाराणसी' फिल्ममधून भारतीय सिनेसृष्टीत परत येत असल्याने चर्चेत आली आहे. याचदरम्यान तिने दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही काही गोष्टी सांगितल्यात. खासकरू निकसोबत तिच्या रिलेशनशिपबाबत.
advertisement
2/5
प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांचं लग्न 2018 साली झाली. त्यांना 2022 साली एक मुलगी झाली, मालती मैरी असं तिचं नाव. प्रियांका आणि निक यांच्या वयात 10 वर्षांचा फरक आहे. त्यामुळे त्यांच्या रिलेशनशिपवर नेहमीच प्रश्न उपस्थित करण्यात आले.
advertisement
3/5
कित्येक वर्षे त्यांच्या घटस्फोटाची चर्चा सुरूच आहे. यावर प्रियांका आणि निकने त्यांचं नातं किती घट्ट आहे, हे दाखवून दिलं आहे. पण तरी चर्चा काही थांबल्या नाहीत. अखेर प्रियांकाने निकसोबतच्या घटस्फोटाबाबत स्पष्टच सांगितलं.
advertisement
4/5
प्रियांका म्हणाली, "आमच्या लग्नाला आता आठ वर्षे झाली आहेत. जर लोक अजूनही हे नातं तुटण्याची किंवा उद्ध्वस्त होण्याची वाट पाहत असतील तर ती त्यांची चॉईस आहे. मी आता त्याबद्दल विचार करणं सोडून दिलं आहे"
advertisement
5/5
"मला माहित नाही की आम्ही असं काय केलं ज्यामुळे लोक आमच्या नात्याबद्दल इतके नाराज झाले. कदाचित आम्ही वेगवेगळ्या देशांचे आहोत, वेगवेगळ्या धर्मांचे आहोत आणि वयाचा फरक आहे म्हणून. हे सर्व खूप वेदनादायी होतं", असं तिने 'व्हरायटी इंडिया'शी बोलताना सांगितलं. पण आता प्रियांका-निक यांना त्यांच्या नात्याभोवती होणाऱ्या चर्चांचा त्रास होत नाही. ते दोघं एकमेकांमध्ये मग्न असतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
वेगळा देश, वेगळा धर्म, वयात अंतर; हे खूप वेदनादायी! निक जोनाससोबत घटस्फोटाबाबत प्रियांका चोप्रा स्पष्टच बोलली
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल