TRENDING:

4 वर्षांपासून पाठपुरावा, निर्माता मंदार देवस्थळीने शशांक केतकरचे किती पैसे थकवलेत?

Last Updated:
Shashank Ketkar - Mandar Devasthali Controversy : अभिनेता शशांक केतकर गेल्या चार वर्षांपासून त्याच्या थकलेल्या पैशांचा पाठपुरावा करतोय. निर्माते मंदार देवस्थळी यांनी शशांकचे नेमके किती पैसे थकवलेत?
advertisement
1/8
4 वर्षांपासून पाठपुरावा, मंदार देवस्थळीने शशांक केतकरचे किती पैसे थकवलेत?
अभिनेता शशांक केतकर आणि प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माते मंदार देवस्थळी यांच्यातील आर्थिक वाद आता चांगलाच चिघळला आहे. 'हे मन बावरे' या लोकप्रिय मालिकेचे निर्माते मंदार देवस्थळी यांनी कलाकारांचे पैसे थकवल्याचा आरोप शशांकने केला असून, याप्रकरणी त्याने पोलिसांत धाव घेतली आहे. 
advertisement
2/8
'हे मन बावरे' ही मालिका संपून अनेक वर्षं उलटली असली तरीही कलाकारांना अद्याप संपूर्ण मोबदला मिळालेला नाही, असा आरोप शशांक केतकरने केला आहे. याबाबत तो गेल्या 4 वर्षांपासून सतत पाठपुरावा करत असल्याचंही त्याने सांगितलं. यापूर्वीही शशांकने वेळोवेळी सोशल मीडियावर आपली भूमिका मांडली होती. अनेकदा मंदार यांनी वेळ मागितला, पैसे देण्याचं आश्वासन दिलं मात्र पैसे दिलेच नाहीत.
advertisement
3/8
केवळ शशांक केतकर नाही तर मालिकेतील अभिनेत्री मृणाल दुसानिस, शर्मिष्ठा राऊत यांच्यासारख्या अनेक कलाकारांचे पैसे थकवले आहेत. कलाकारांनी कोरोना काळातही पैशांसाठी आवाज उठवला होता.  
advertisement
4/8
मंदार देवस्थळी यांनी आज पैसे देतो, असं आश्वासन दिलं होतं. मात्र त्यानंतरही पैसे न मिळाल्याने शशांकने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत गंभीर आरोप केले आहेत. या व्हिडीओसोबतच त्याने मंदार देवस्थळी यांच्याशी झालेल्या काही चॅट स्क्रिनशॉट्सही शेअर केलेत. 
advertisement
5/8
 मंदार देवस्थळी यांनी शशांक केतकरचे असे किती पैसे थकवले होते. असा प्रश्न अनेकांना पडला होता. ज्याच्यासाठी शशांक गेली चार वर्ष पाठपुरावा करतोय ते किती पैसे निर्मात्याने थकवले आहेत. 
advertisement
6/8
थकबाकीच्या रकमेबाबत बोलताना शशांकने स्पष्ट केलं की, "5,00,000 ही एखाद्या साठी मोठी रक्कम आहे की नाही मला माहीत नाही पण माझ्यासाठी तरी आहे. हे मन बावरे या मालीकेचे पर डे प्रमाणे ठरलेले पैसे कसे बसे मी काढून घेतले ( मुद्दल) पण जो TDS त्याने कापला आहे तो अजूनही बाकी आहे. म्हणजे त्यानी पेमेंट देताना TDS कापला आणि गव्हरमेन्टला भरला नाही असा दुहेरी गुन्हा केला आहे."
advertisement
7/8
शशांक केतकरचे तब्बल 5 लाख रुपये मंदार देवस्थळी यांच्याकडे थकित आहेत. त्याने मालिकेचा पर डे देखील अनेकदा गयावया करून घेतल्याचं त्याने सांगितलं. 
advertisement
8/8
 'हे मन बावरे' ही मालिका कलर्स मराठीवर लागायची. ऑक्टोबर 2018 रोजी ही मालिका सुरू झाली. ऑक्टोबर 2020 रोजी या मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतला. मृणाल दुसानिस, शशांक केतकर, शर्मिष्ठा राऊत, नयना आपटे, वंदना गुप्ते, माधवी जुवेकर सारखे कलाकार यात महत्त्वाच्या भूमिकेत होते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
4 वर्षांपासून पाठपुरावा, निर्माता मंदार देवस्थळीने शशांक केतकरचे किती पैसे थकवलेत?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल