TRENDING:

Angarki Sankashti Chaturthi: अंगारकी चतुर्थीनिमित्त प्रसिद्ध राजूर गणपती मंदिराला आकर्षक रोषणाई, पाहा Photos

Last Updated:
नव वर्षातील पहिली अंगारकी चतुर्थी ६ जानेवारी रोजी आहे. जालना जिल्ह्यातील राजूर येथील गणपतीच्या दर्शनासाठी भाविक सोमवारी सायंकाळ पासूनच राजूरकडे पायी प्रस्थान करत आहेत. यंदा महा गणपतीच्या मंदिराला तब्बल २ लक्ष ४० हजार दिव्यांनी आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.
advertisement
1/6
अंगारकी चतुर्थीनिमित्त प्रसिद्ध राजूर गणपती मंदिराला आकर्षक रोषणाई, पाहा Photos
नव वर्षातील पहिली अंगारकी चतुर्थी ६ जानेवारी रोजी आहे. जालना जिल्ह्यातील राजूर येथील गणपतीच्या दर्शनासाठी भाविक सोमवारी सायंकाळ पासूनच राजूरकडे पायी प्रस्थान करत आहेत. यंदा महा गणपतीच्या मंदिराला तब्बल २ लक्ष ४० हजार दिव्यांनी आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.
advertisement
2/6
राजूर गणपती देवस्थान हे मराठवाड्यासह विदर्भ आणि खानदेशातही प्रसिद्ध देवस्थान आहे. अंगारकी चतुर्थीला तब्बल १० ते १२ लक्ष भाविक येतील असा अंदाज आहे.
advertisement
3/6
त्या दृष्टीने भाविकांची व्यवस्था व्हावी. त्यांना कोणत्याही प्रकारच्या त्रासाला अथवा गैरसोयीला सामोरे जावे लागू नये म्हणून चोख व्यवस्था करण्यात आली आहे. पोलिसांच्या तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ठिकठिकाणी वाहतूक पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
advertisement
4/6
त्याच बरोबर पायी येणाऱ्या भाविकांना रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी दानशूर व्यक्तींनी चहा पाणी आणि नास्त्याची सोय केली आहे. भाविकांना कोणत्याही अडचणी किंवा समस्येवर तोंड द्यावे लागत असेल तर त्यांनी मंदिर समिती प्रशासनाला कळवावे असं आवाहन करण्यात आलं आहे.
advertisement
5/6
दरम्यान, नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच अंगारकी चतुर्थी आल्याने भाविकांची संख्या लक्षणीय राहण्याची शक्यता आहे. मंदिराला केलेल्या आकर्षक विद्युत रोषणाई मुळे मंदिर परिसर उजळून निघाला आहे.
advertisement
6/6
भाविकांमध्ये दर्शनासाठी उत्साह पाहायला मिळत असून रात्री बारा वाजता दर्शन रांग सुरू होणार आहे. महा गणपतीच्या दर्शनासाठी परभणी नांदेड, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, बुलढाणा यांसारख्या जिल्ह्यातून मोठ्या संख्येने भाविक दाखल होत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Angarki Sankashti Chaturthi: अंगारकी चतुर्थीनिमित्त प्रसिद्ध राजूर गणपती मंदिराला आकर्षक रोषणाई, पाहा Photos
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल