Pushpa 2ने रिलीजआधीच मोडला रेकॉर्ड, 1M हून अधिक बुकिंग, एका तिकीटाची किंमत किती?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
pushpa 2 Ticket Price : अभिनेता अल्लू अर्जून आणि रश्मिका मंदाना यांचा पुष्पा 2 हा सिनेमा 5 डिसेंबरला रिलीज होणार आहे. सिनेमाचं एडवान्स बुकींग जोरात सुरू आहे. एडवान्स बुकींगचा आकडा ऐकून सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
advertisement
1/9

पुष्पा 2 चं एडवान्स बुकींग सुरू होऊन अवघे 48 तास होत नाही तोच सिनेमाची 1 मिलियनहून अधिक तिकिटं विकली गेली आहेत.
advertisement
2/9
सिनेमा पहिल्या दिवशी सगळ्या साऊथ सिनेमांचे रेकॉर्ड मोडणार असं म्हटलं जात आहे.
advertisement
3/9
Sacnilk च्या रिपोर्टनुसार, सोमवारी रात्री 10 वाजेपर्यंत पुष्पा 2 सिनेमाची एकूण 10,11,247 (1 मिलियन) हून अधिक तिकिटांचं बुकींग झालं आहे.
advertisement
4/9
सिनेमा रिलीज होण्यासाठी अजून 2 दिवस बाकी आहेत. असं म्हटलं जात आहे की, एडवान्स बुकींगचा हा आकडा 2 मिलियनवर जाऊ शकतो.
advertisement
5/9
पुष्पा 2 रिलीज झाल्यानंतरचे चार दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, पुष्पा 2 पहिल्या दिवशी 300 कोटींची कमाई करू शकतो.
advertisement
6/9
Sacnilk च्या रिपोर्टनुसार तेलंगणामध्ये पहिल्या दिवशी पुष्पा 2 105 कोटींची कमाई करू शकतो. तर कर्नाटकात 20, तमिळनाडूमध्ये 15, केरळमध्ये 8 आणि भारतातील इतर राज्यांमध्ये 85 कोटींची कमाई करू शकतो.
advertisement
7/9
मुंबईत पुष्पा 2ची एक तिकिट 800 - 1800 रुपयांपर्यंत आहेत. 3Dफॉर्मेटची तिकिटे 300-700रुपयांपर्यंत आहेत. त्याचप्रमाणे 2Dफॉर्मेट हिंदी वर्जनची तिकिटे 200-300 रुपयांपर्यंत आहेत.
advertisement
8/9
तर पुण्यामध्ये पुष्पा 2ची तिकिटे 400 - 1000 रुपयांना विकली जात आहेत.
advertisement
9/9
देशातील अनेक ठिकाणी पुष्पा 2ची तिकिटे 944, 1200 रुपयांना विकल्या जात आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Pushpa 2ने रिलीजआधीच मोडला रेकॉर्ड, 1M हून अधिक बुकिंग, एका तिकीटाची किंमत किती?