रजनीकांतच्या त्या 7 फिल्म्स, अर्ध्या वयाच्या अभिनेत्रींसोबत केला रोमान्स, 1 तर 37 वर्षांनी लहान
- Published by:Minal Gurav
Last Updated:
रजनीकांत यांची फॅन फॉलोविंग खूप मोठी आहे. त्यांनी त्यांच्या काळातील ते आताच्या नव्या अभिनेत्रींसोबतही काम केलं आहे. या वयातही चाहत्यांना त्यांना नायकाच्या भूमिकेत पाहणं आवडतं. रजनीकांत यांनी रुपेरी पडद्यावर अनेक नायिकांसोबत काम केलं आहे, त्यापैकी काही त्यांच्यापेक्षा खूपच लहान होत्या. रजनीकांत यांनी 20 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या अभिनेत्रीसोबत रोमँटीक सीन्स दिलेत. एक अभिनेत्री तर 37 वर्षांनी लहान होती.
advertisement
1/8

रजनीकांत यांनी त्यांच्या वयाच्या 75 वर्ष तर चित्रपटसृष्टीत 50 वर्षे पूर्ण केली आहेत. रजनीकांत हे अ‍ॅक्शनने भरलेल्या मास चित्रपटांसाठी ओळखले जातात. या वयातही चाहत्यांना त्यांना नायकाच्या भूमिकेत पाहणे आवडते हे आश्चर्यकारक आहे. त्यांचे असे सात चित्रपट ज्यात त्यांनी रजनीकांत त्यांच्या वयाच्या अर्ध्या वयाच्या हिरोईनसोबत रोमान्स केला.
advertisement
2/8
2016 मध्ये रजनीकांतचा 'कबाली' हा चित्रपट प्रदर्शित झाला. सुपरस्टारने राधिका आपटेसोबत काम केले होते. दोघांमध्ये 35 वर्षांचा फरक आहे. पण रजनीकांतने मोठ्या पडद्यावर खूप लहान नायिकांसोबत रोमान्स केला होता.
advertisement
3/8
रजनीकांतचा 'लिंगा' हा चित्रपट 2014 मध्ये प्रदर्शित झाला होता. सोनाक्षी सिन्हा आणि अनुष्का शेट्टी यांच्या प्रमुख भूमिकेत होत्या. सोनाक्षी रजनीकांतपेक्षा 37 वर्षांनी लहान आहे. तर अनुष्का शेट्टी त्यांच्यापेक्षा 31 वर्षांनी लहान आहे.
advertisement
4/8
ऐश्वर्या राय बच्चननेही मोठ्या पडद्यावर रजनीकांतसोबत रोमँटिक सीन्स दिले आहेत. दोघांनी 2010 मध्ये आलेल्या 'एंथिरन' (रोबोट) सिनेमात काम केलं. ऐश्वर्या आणि रजनीकांत यांच्या वयात 23 वर्षांचा फरक आहे.
advertisement
5/8
रजनीकांतने अलीकडेच मनीषा कोइरालासोबत बाबा सिनेमात काम केलं होतं. रजनीकांत मनीषा कोइरालापेक्षा 20 वर्षांनी मोठे आहेत.
advertisement
6/8
2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'शिवाजी' या चित्रपटात रजनीकांत आणि श्रिया सरन यांची जोडी होती. प्रेक्षकांनी त्यांच्या केमिस्ट्रीचे कौतुक केलं. रजनीकांत यांनी साकारलेल्या डॅशिंग हिरोची भूमिका हिट झाली. दोन्ही स्टार्समध्ये 32 वर्षांचा वयाचा फरक आहे.
advertisement
7/8
सलमान खानच्या जुडवा चित्रपटात दिसलेल्या रंभाने रजनीकांतसोबतही काम केलं आहे. 26 वर्षांनी लहान असलेल्या रंभानं रजनीकांतसोबत अरुणाचलम चित्रपटात काम केलं होतं.
advertisement
8/8
एसएस राजामौली यांच्या बाहुबली चित्रपटातून रम्या कृष्णन प्रसिद्ध झाली. 1999 मध्ये आलेल्या पदयप्पा चित्रपटात तिनं रजनीकांतसोबत काम केलं होतं. त्यांची केमिस्ट्री मोठ्या पडद्यावर हिट झाली होती. रम्या प्रत्यक्षात रजनीकांतपेक्षा 26 वर्षांनी लहान आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
रजनीकांतच्या त्या 7 फिल्म्स, अर्ध्या वयाच्या अभिनेत्रींसोबत केला रोमान्स, 1 तर 37 वर्षांनी लहान