TRENDING:

रोलसाठी स्टारची थरकाप उडवणारी मेहनत, ३० किलो वजन घटवलं; चालताही येईना, सेटवर बेशुद्ध पडण्याची वेळ

Last Updated:
सेलिब्रिटी मंडळी कायमच फिटनेस फ्रीक असतात, कुठेही असो अगदी शुटिंगपासून वैयक्तिक आयुष्यापर्यंत... प्रत्येक ठिकाणी ते आपल्या फिटनेसची विशेष काळजी घेत असतात. अनेक जण हँडसम दिसण्यासाठी वजन कमी करतात, तर काही जण आपल्या आगामी भूमिकेसाठी सुद्धा वेट लॉस करतात. अनेक सेलिब्रिटींना त्यांच्या भूमिकेंसाठी फिटनेससोबत तडजोड करावी लागते. अशाच एका अभिनेत्याला त्याच्या एका भूमिकेसाठी खूप मोठ्या प्रमाणावर वजन कमी करावं लागलेलं. त्याचा फोटो पाहून अनेकांनी तर त्याला पहिल्यांदा ओळखलंच नव्हतं.
advertisement
1/8
फिटनेस अंगाशी आलं! 30किलो वजन कमी; सेटवर बेशुद्ध पडण्याची वेळ, चालणंही झालं कठीण
सेलिब्रिटी मंडळी कायमच फिटनेस फ्रीक असतात, कुठेही असो अगदी शुटिंगपासून वैयक्तिक आयुष्यापर्यंत... प्रत्येक ठिकाणी ते आपल्या फिटनेसची विशेष काळजी घेत असतात. अनेक जण हँडसम दिसण्यासाठी वजन कमी करतात, तर काही जण आपल्या आगामी भूमिकेसाठी सुद्धा वेट लॉस करतात. अनेक सेलिब्रिटींना त्यांच्या भूमिकेंसाठी फिटनेससोबत तडजोड करावी लागते.
advertisement
2/8
अशाच एका अभिनेत्याला त्याच्या एका भूमिकेसाठी खूप मोठ्या प्रमाणावर वजन कमी करावं लागलेलं. त्याचा फोटो पाहून अनेकांनी तर त्याला पहिल्यांदा ओळखलंच नव्हतं. वजन कमी करण्यासोबतच वजन वाढवण्यासाठीही अनेक सेलिब्रिटी विशेष मेहनत घेतात. बॉलिवूडसोबतच टॉलिवूडमध्येही असे काही सेलिब्रिटी आहेत. आपल्या भूमिकेसाठी 'या' सेलिब्रिटीने मोठ्या प्रमाणावर वजन कमी केलं होतं. कोण आहे तो पाहूया...
advertisement
3/8
केवळ बॉलिवूडमध्येच नाही तर टॉलिवूडमध्येही असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी फार मोठ्या प्रमाणावर आपली शरीरयष्टीच बदलली. आगामी भूमिकेसाठी अनेक सेलिब्रिटी त्यांचं सर्वस्व धोक्यात घालतात. अभिनेता विक्रम टॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये यासाठी ओळखला जातो. त्याने 'आय' चित्रपटातील त्याच्या भूमिकेने प्रेक्षकांना थक्क केले. या चित्रपटासाठी त्याने इतके वजन कमी केले की तो ओळखता येत नव्हता. त्याप्रमाणेच बॉलिवूडचा रणदीप हुड्डा देखील.
advertisement
4/8
रणदीप हुड्डाने 2016 आणि 2024 मध्ये काढलेले फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यात त्याचा लूक पूर्णपणे वेगळा दिसतो. 2016 मध्ये रणदीपने 'दो लफझों की कहानी' चित्रपटात माजी बॉक्सर आणि मार्शल आर्ट्स तज्ञाची भूमिका केली होती. या भूमिकेसाठी त्याने त्याच्या लूकसाठी विशेष मेहनत घेतली. त्याच वर्षी त्याचा 'सरबजीत' हा चित्रपटही प्रदर्शित झाला, ज्यामध्ये त्यांनी तुरुंगातील कैद्याची भूमिका केली होती. त्याची ही भूमिका सुद्धा चाहत्यांना फार पटली.
advertisement
5/8
'सरबजीत' चित्रपटातील भूमिकेसाठी रणदीप हुड्डाने अंदाजे 28 किलो वजन कमी केले होते. संपूर्ण फिटनेस कायम ठेवण्यासाठी अभिनेत्याने कठोर परिश्रम केले. या चित्रपटांमधील त्याच्या ट्रान्सफॉर्मेशनने प्रेक्षकांना भुरळ घातली. या भूमिकेची तयारी करण्यासाठी त्याने खूप स्ट्रीक्ट डाएट फॉलो केला होता. काही दिवस तो फक्त पाणी आणि कॉफीवरच जगला.
advertisement
6/8
2024 मध्ये, रणदीप हुड्डाने 'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटात सावरकरांची भूमिका केली आहे. त्याने स्वतःला अशा व्यक्तिरेखेत रूपांतरित केले ज्यावर विश्वास ठेवणे कठीण होते. शिवाय, सरबजीतमध्ये, त्याने स्वतःला खूप बारीक केले होते, त्यामध्ये फक्त त्याचा हाडाचा सापळाच दिसत होता. शुटिंग सुरू होण्यापूर्वी त्याचे वजन सुमारे 92 किलो होते, परंतु चित्रपटाच्या वेळी त्याचं वजन फक्त 60 किलोपर्यंतच होते.
advertisement
7/8
2024 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत, रणदीपने स्वतः खुलासा केला की त्याचे वजन दीड वर्षांपासून वाढतच नव्हते. स्नायूंची सर्व ताकद कमी झाली होती, त्याला चालण्यासही त्रास होत होता. त्याने स्पष्ट केले की बराच काळ योग्य आहार न घेतल्यामुळे शरीरावर फार परिणाम झाला होता. त्या भूमिकेचा त्याच्यावर खोलवर परिणाम झाला. शुटिंगवेळी तो अनेक वेळा बेशुद्ध पडला होता.
advertisement
8/8
घोडेस्वारी करताना सुद्धा तो एकदा बेशुद्ध पडला, ज्यामुळे त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. रणदीप हुड्डाच्या जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशनमुळे त्याच्या आरोग्याबद्दल अनेकदा प्रश्न उपस्थित झाले होते. अनेक चाहत्यांचं असं मत विश्वास आहे की, फिल्म इंडस्ट्रीतील त्याची कामाप्रती आवड आणि डेडिकेशनच त्याच्या कामाची पोचपावती आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
रोलसाठी स्टारची थरकाप उडवणारी मेहनत, ३० किलो वजन घटवलं; चालताही येईना, सेटवर बेशुद्ध पडण्याची वेळ
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल