डिवोर्समुळे डिप्रेशन, गंभीर आजाराशी सामना करत होती BB फेम अभिनेत्री, 9 वर्षांनी दिली मोठी अपडेट
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Bigg Boss Fame Actress : 'बिग बॉस 13' फेम अभिनेत्री वयाच्या 39 व्या वर्षी गंभीर आजाराशी झुंज देत आहे. पण हिंमत न हारता तिने 9 किलो वजन कमी केलं आहे.
advertisement
1/7

छोट्या पडद्यावरील 'उतरन' या मालिकेतील तपस्या या भूमिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेल्या रश्मी देसाईने आपल्या फिटनेसबद्दल खुलेपणाने भाष्य केलं आहे. गंभीर आजाराशी झुंज देणाऱ्या रश्मीने 9 किलो वजन कमी केलं आहे.
advertisement
2/7
रश्मी देसाईने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत लिहिलं आहे,"हा प्रवास सोपा नव्हता. मी अद्याप माझ्या ध्येयापर्यंत पोहोचले नाही. माझा स्वत:वर विश्वास आहे. विश्वासाच्या जोरावर मी 9 किलो वजन कमी केलं आहे".
advertisement
3/7
रश्मिकाने पुढे लिहिलंय,"सध्या गंभीर आजाराशी झुंज देणं सुरू आहे. स्वत:कडून मी खूप अपेक्षा ठेवते. तुम्ही उत्तम काम करत असाल तर जग तुमच्यासाठी थांबू शकतं. त्यामुळे योग्यवेळी योग्य काम करा. मी माझ्या प्रवासाची सुरुवात केली आहे".
advertisement
4/7
आरती सिंहच्या संगीत समारंभातील फोटो व्हायरल झाल्यानंतर रश्मीला बॉडी शेमिंगचा सामना करावा लागला होता. त्यावेळी "या इंडस्ट्रीत टिकून राहण्यासाठी समर्पण आवश्यक आहे. प्रत्येकवेळी मी 21-22 वर्षांची दिसू शकत नाही. माझा प्रवास सुंदर आहे. पण काही लोकांसाठी बदल स्वीकारणं कठीण असतं", असं अभिनेत्री म्हणालेली.
advertisement
5/7
रश्मी देसाई शेवटची 2025 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'मोम तने नै समझ' या चित्रपटात झळकली होती. तसेच 2023 मध्ये ती 'रात्री के यात्री 2'मध्येही दिसली होती.
advertisement
6/7
रश्मीने 'उतरन' या मालिकेच्या माध्यमातून अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. 'नागिन 4'मुळे तिला लोकप्रियता मिळाली. 'बिग बॉस 13' या लोकप्रिय वादग्रस्त कार्यक्रमातही रश्मी सहभागी झाली होती.
advertisement
7/7
रश्मी देसाई नंदीश संधूसोबत लग्नबंधनात अडकली होती. पण 4 वर्षांच्या नात्यानंतर 2016 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
डिवोर्समुळे डिप्रेशन, गंभीर आजाराशी सामना करत होती BB फेम अभिनेत्री, 9 वर्षांनी दिली मोठी अपडेट