TRENDING:

Rashmika Mandanna : लग्नाला काहीच दिवसच झालेत अन् रश्मिका असं काय बोलून गेली, रडू लागल्या सासूबाई

Last Updated:
अभिनेत्री रश्मिका मंदाना लग्नानंतर पहिल्यांदाच पुरस्कार सोहळ्यात पोहोचली. तिथे रश्मिका असं काय बोलली जे ऐकून तिच्या सासूबाईंना चारचौघात रडू कोसळलं.
advertisement
1/8
लग्नाला काहीच दिवसच झालेत अन् रश्मिका असं काय बोलून गेली, रडू लागल्या सासूबाई
हे वर्ष रश्मिका मंदानाच्या आयुष्यातील सर्वोत्तम वर्ष ठरले आहे. तिचा जवळचा मित्र विजय देवराकोंडासोबत लग्न करून रश्मिका मंदानाने एका नवीन कौटुंबिक जीवनात प्रवेश केला आहे.
advertisement
2/8
रश्मिका आणि विजय देवराकोंडा यांचे लग्न फेब्रुवारी महिन्यात झाले. उदयपूरमधील एका राजवाड्यासारख्या ठिकाणी त्यांचा विवाह झाला. 'डिअर कॉम्रेड' या चित्रपटातून सुरू झालेले त्यांचे नाते प्रेम आणि विवाहात रूपांतरित झाले. मार्च महिना रश्मिकाच्या आयुष्यात आणखी एक आनंद घेऊन आला आहे.
advertisement
3/8
पुरस्कार स्वीकारण्यासाठी नवविवाहित रश्मिका तिच्या पतीसोबत आली असेल असा तुमचा समज असेल तर तो चुकीचा आहे. रश्मिका विजय देवराकोंडाची आई म्हणजेच सासूबाई माधवी देवराकोंडा यांच्यासोबत आली होती. लग्नानंतरच्या पहिल्या उगादी पूजेनंतर रश्मिका मंदाना पुरस्कार स्वीकारण्यासाठी पोहोचली.
advertisement
4/8
एका सुंदर साडीत पुरस्कार स्वीकारायला आलेल्या रश्मिका मंदानाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. पुरस्कार स्वीकारताना ती जे काही बोलली ते ऐकून तिच्या सासूबाई माधवी यांच्या डोळ्यातही पाणी आले.
advertisement
5/8
"एक काळ होता जेव्हा मला माझ्या अभिनयामुळे ट्रोल केले जायचे. पण बघा आता मला माझ्या अभिनयासाठी राज्याची ओळख मिळाली आहे. मला असे वाटते की मी खूप मोठा पल्ला गाठला आहे..." असं रश्मिका म्हणाली. 
advertisement
6/8
"'द गर्लफ्रेंड'सारख्या चित्रपटासाठी पुरस्कार जिंकणे खूप खास आहे. अशा प्रकारची ओळख आम्हाला असे चित्रपट बनवण्यासाठी अधिक आत्मविश्वास देते," असंही रश्मिका म्हणाली. "लग्नानंतरचा हा पहिलाच सण होता. पूजा पूर्ण करून मी पुरस्कार सोहळ्याला पोहोचले. हे खूप सुंदर आहे. माझं मन भरून आलं आहे," असंही रश्मिकाने सांगितलं. 
advertisement
7/8
कार्यक्रमाच्या सूत्रसंचालकाने आणखी एका गोष्टीवर जोर दिला. ही पहिली उगादी तर होतीच, पण विजय देवराकोंडाशी लग्न झाल्यानंतरचा रश्मिकाचा हा पहिला विजयही ठरला.
advertisement
8/8
यावर रश्मिकाने उत्तरही दिले. "सून होण्यापूर्वीही तुम्ही माझ्यावर मुलीसारखं प्रेम केलंत. आज मी अधिकृतपणे सून म्हणून तुमच्यासमोर उभी आहे. याचा मला खूप अभिमान वाटतो. मी तुमच्या प्रेमाची सदैव ऋणी राहीन."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Rashmika Mandanna : लग्नाला काहीच दिवसच झालेत अन् रश्मिका असं काय बोलून गेली, रडू लागल्या सासूबाई
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल