TRENDING:

व्हॅलेंटाईन सेलिब्रेट नाही केला म्हणून बायको-GF रागावली; मग या फिल्म दाखवा, शेवटची पाहून ती तुम्हाला सोडणारच नाही

Last Updated:
Romantic Movies : व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट केला नाही म्हणून रागावलेल्या बायको किंवा गर्लफ्रेंडला हा एकच सिनेमा दाखवला. शेवटचा पाहून ती तुम्हाला सोडणारच नाही.
advertisement
1/8
व्हॅलेंटाईन सेलिब्रेट नाही केला म्हणून बायको-GF रागावली; मग या फिल्म दाखवा
14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे झाला. पण यादिवशी खास तुम्ही काही खास प्लान केला नव्हता का? वेळ मिळाला नाही, कामात होतो ही कारणं पार्टनरला फारशी पटत नाहीत. पण रिलेशनशिप एक्स्पर्ट्स सांगतात की राग कमी करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे एकमेकांबरोबर घालवलेला क्वालिटी टाइम आणि त्यासाठी एक रोमँटिक मूव्ही डेट तो बनता हे बॉस.
advertisement
2/8
रोमँटिक चित्रपट फक्त मनोरंजन करत नाहीत तो भावना जाग्या करतात. प्रेमाची किंमत पुन्हा जाणवून देतो. अनेक कपल्स सांगतात की एकत्र प्रेमकथा पाहताना न बोलताही खूप काही बोललं जातं. जर तुमची पत्नी किंवा गर्लफ्रेंड नाराज असेल तर योग्य फिल्म निवडणं महत्त्वाचं ठरतं.
advertisement
3/8
प्रेम संयम, आदर आणि कुटुंबाची कदर हे सगळं तुम्हाला तुमच्या बायकोला सांगायचं असेल तर 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' हा सिनेमा पाहायलाच लागतोय.  हिरो शेवटपर्यंत हिरोईनच्या कुटुंबाचा सन्मान राखतो. तुम्हीही तुमच्या गर्लफ्रेंडला असं काही सांगताय तर तिच्यासोबत हा सिनेमा मराठा मंदिरला जाऊन नक्की बघा. तुम्ही तिच्यासाठी किती सीरियस आहात हे या सिनेमातून तुम्हाला तिला सांगता येईल.
advertisement
4/8
हलकाफुलका पण हृदयाला भिडणारा 'जब वी मेट' हा सिनेमा. यात प्रेमामुळे आयुष्य बदलू शकतं हे दाखवलंय. रागावलेली GF हसली की अर्धा राग तिथेच संपेल. हा सिनेमा तेच काम करेल.
advertisement
5/8
त्यागाचं सर्वोच्च उदाहरण म्हणजे 'टायटॅनिक' हा सिनेमा आहे. मी तुझ्यासाठी काहीही करेन हे तुम्हाला बायको किंवा गर्लफ्रेंडला सांगायचं आहे तर हा सिनेमा तिच्याबरोबर बघाच.
advertisement
6/8
प्रेम आणि करिअरमधील संघर्ष दाखवणारा 'ला ला लँड' हा सिनेमा.  कधी कधी प्रेम म्हणजे सोडून देणंही असतं. मॅच्युअर कपल्सना हा सिनेमा खूप रिलेट होतो.
advertisement
7/8
मराठीतील रॉ आणि रिअल प्रेमकथा म्हणजे सैराट. प्रेमासाठी किती मोठी किंमत मोजावी लागू शकते हे आर्ची आणि परशाची लव्ह स्टोरी पाहिली की कळतं.
advertisement
8/8
आणखी एक स्पेशल टीप मूव्ही डेट आणखी खास बनवण्यासाठी तिचा आवडता खाऊ सोबत ठेवा. फोन बाजूला ठेवून पूर्ण लक्ष पार्टनरवर ठेवा आणि मध्येच मनापासून तिला सॉरीही म्हणून टाका. तुमचं अर्ध काम तिथेच होईल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
व्हॅलेंटाईन सेलिब्रेट नाही केला म्हणून बायको-GF रागावली; मग या फिल्म दाखवा, शेवटची पाहून ती तुम्हाला सोडणारच नाही
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल