Sachin Kumavat : 'कोणाचाही द्वेष न करता 6 आठवडे...' Bigg Boss Marathi 6 मधून बाहेर येताच सचिन कुमावतची पोस्ट
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Bigg Boss Marathi 6 च्या घरातून सहाव्या आठवड्यात खान्देश किंग सचिन कुमावत आऊट झाले. घराबाहेर पडल्यानंतर सचिन यांची पोस्ट लिहित भावना व्यक्त केल्यात.
advertisement
1/8

'खान्देश किंग' म्हणून ओळखला जाणारा सचिन कुमावत सध्या चर्चेत आहेत. सचिन कुमावत यांचा Bigg Boss Marathi च्या घरातून सहा आठवड्यांनंतर प्रवास संपला. सचिन घराबाहेर पडल्याची बातमी समोर येताच त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. सोशल मीडियावर अनेकांनी त्याच्या खेळाचं कौतुक करत नाराजीही व्यक्त केली.
advertisement
2/8
घरातून बाहेर आल्यानंतर सचिन यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून त्याने आपल्या संपूर्ण प्रवासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. "बिग बॉस मराठीच्या घरात जाणं अनेकांचं स्वप्न असतं. खानदेशातला एक कलाकार ते बिग बॉस मराठी इथपर्यंतचा हा प्रवास माझ्यासाठी खास होता."
advertisement
3/8
सचिन यांनी पुढे लिहिलंय, "एक कलाकार म्हणून 6 आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकू शकलो तेही कोणाचाही द्वेष न करता, प्रामाणिकपणे खेळत. या संपूर्ण प्रवासात दिलेल्या तुमच्या प्रेमासाठी मनापासून धन्यवाद." त्यांनी पोस्टमध्ये #khandeshking असा हॅशटॅगही वापरला आहे.
advertisement
4/8
सचिनच्या या पोस्टनंतर त्याच्या चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला. एका चाहत्यानं लिहिलंय "तू आमच्यासाठीच विजेता आहेस" दुसऱ्यानं लिहिलंय, "तुझा खेळ प्रामाणिक होता". आणखी एकानं लिहिलंय, "खान्देशचा अभिमान".
advertisement
5/8
बिग बॉसच्या घरात असताना सचिन यांनी आक्रमक भूमिका न घेता नेहमीच संयम आणि शांततेचा मार्ग निवडला होता. कोणत्याही वादात न अडकता त्याने आपली ओळख प्रामाणिक स्पर्धक म्हणून निर्माण केली.
advertisement
6/8
'बिग बॉस मराठी 6' मध्ये अनेक चढ-उतार पाहायला मिळाले. टास्कदरम्यान निर्माण झालेले वाद, मैत्री आणि स्पर्धा यामध्ये सचिनने स्वतःची वेगळी छाप पाडली. जरी त्याचा प्रवास इथे थांबला असला तरी त्याने जिंकलेलं प्रेक्षकांचं मन कायम राहणार आहे.
advertisement
7/8
पोस्टच्या शेवटी सचिन यांनी "महाराष्ट्राने दिलेल्या अपार प्रेमाबद्दल मनापासून धन्यवाद. तुमचे आशीर्वाद माझ्यासोबत असेच राहू द्या. लवकरच पुन्हा भेटू", असंही लिहिलं आहे.
advertisement
8/8
सचिन कुमावतचा हा प्रवास जरी सहा आठवड्यांवर थांबला असला तरी त्याच्या चाहत्यांसाठी तो खऱ्या अर्थाने विजेता ठरला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Sachin Kumavat : 'कोणाचाही द्वेष न करता 6 आठवडे...' Bigg Boss Marathi 6 मधून बाहेर येताच सचिन कुमावतची पोस्ट