TRENDING:

ZIDD! प्रसाद-दीपिकाचं सस्पेंड अकाऊंट पुन्हा सुरू, Insta ने मागितली 'प्रसिका'ची माफी

Last Updated:
prasika_official इन्स्टाग्राम अकाऊंट प्रसाद आणि दीपिका वेदपाठक यांना दहा दिवसांनी परत मिळालं आहे. दीपिकाने स्वत: पोस्ट शेअर करत ही माहिती दिली.
advertisement
1/9
प्रसाद-दीपिकाचं सस्पेंड अकाऊंट पुन्हा सुरू, Insta ने मागितली 'प्रसिका'ची माफी
मागील काही दिवसांआधी सोशल मीडियावरचं प्रसिद्ध कंटेट क्रिएटर कपल प्रसिकाचं इन्स्टाग्राम अकाऊंट सस्पेंड करण्यात आलं होतं. एक नाही तर त्यांचे चार अकाऊंड अचानक कोणतंही नोटिफिकेशन न देता सस्पेंड करण्यात आलं होतं.
advertisement
2/9
प्रसिकाच्या चाहत्यांसाठी आनंदी बातमी समोर आली आहे. दहा दिवसांतच त्यांना त्यांचं अकाऊंट परत मिळालं आहे. प्रसाद आणि दीपिका वेदपाठक यांचं prasika_official हे इन्स्टाग्राम अकाऊंट पुन्हा सुरू करण्यात आलं आहे.
advertisement
3/9
दीपिकाने इन्स्टाग्रामवर स्क्रिन शॉट शेअर करत ही माहिती दिली आहे. ही माहिती मिळताच त्यांच्या चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
advertisement
4/9
दीपिका आणि प्रसाद यांची चार इन्स्टाग्राम अकाऊंट सस्टेंड करण्यात आली होती. परंतू आता त्यातील prasika_official हे एकच अकाऊंट पुन्हा सुरू करण्यात आलं आहे. आणखी तीन अकाऊंट डिअँक्टिव्ह असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे.
advertisement
5/9
अकाऊंड सस्पेंड झाल्यानंतर प्रसादने व्हिडीओ शेअर करत इन्स्टाग्राम आणि मेटाला त्यामागचं कारण विचारत अकाऊंट पुन्हा सुरू करण्याची विनंती केली होती. मात्र मेटाकडून अनेक दिवस काहीच प्रतिसाद येत नव्हता. दोघांनी मेटाच्या बीकेसीतील ऑफिसला भेट दिली होती. मात्र त्यांना रिसेप्शनवरच थांबवण्यात आलं होतं.
advertisement
6/9
तब्बल एक आठवड्यानंतर प्रसिकाचं इन्स्टाग्राम अकाऊंट पुन्हा सुरू करण्यात आलं आहे. "100 वेळा पडलो... 101 वेळा उठू!" अशी पोस्टही दीपिकानं लिहिली होती.
advertisement
7/9
इन्स्टाग्रामकडून आलेल्या मेलच्या स्क्रिनशॉट दीपिकानं शेअर केला. ज्यात त्यांनी लिहिलंय, "तुम्ही अकाउंटच्या रिव्ह्यूसाठी विनंती केल्याबद्दल धन्यवाद. आम्ही तुमचं अकाउंट तपासलं असून त्यावरील अ‍ॅक्टिव्हिटी आमच्या Instagram च्या वापर अटींनुसार (Terms of Use) योग्य असल्याचं आढळलं आहे. त्यामुळे तुम्ही आता पुन्हा Instagram वापरू शकता. आमच्याकडून झालेल्या चुकीबद्दल आणि काही काळ तुम्हाला Instagram वापरता न आल्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. आमच्या कम्युनिटीला सुरक्षित ठेवण्यासाठी काही वेळा आम्हाला अशी कारवाई करावी लागते."
advertisement
8/9
प्रसाद आणि दीपिका गेल्या अनेक वर्षांपासून अनेक लोकांना त्यांच्या व्यावसायात मोठं होण्यासाठी मदत करत आहेत. जिद्द ठेवा एक दिवस नक्कीच तुम्हाला हवं ते तुम्ही मिळणार असं ते अनेकांना सांगतात.
advertisement
9/9
ZIDD या नावाने त्यांनी मार्केटमध्ये स्वत:चे टी- शर्ट देखील अनेक वर्षांपूर्वी काढलं होतं. ज्याला आजही चांगला प्रतिसाद मिळतो. आज त्यांच्यापुढ्यात आलेल्या आव्हानांचा त्यांनी ZIDDने सामना केला आणि त्यात ते यशस्वी ठरल्याचं दिसतंय. 
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
ZIDD! प्रसाद-दीपिकाचं सस्पेंड अकाऊंट पुन्हा सुरू, Insta ने मागितली 'प्रसिका'ची माफी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल