TRENDING:

सलमान खानची भाचीही आहे अभिनेत्री! 2 चित्रपटात काम, आता येतेय तिसरी फिल्म, सौंदर्यात Star Actress ना टक्कर देतेय

Last Updated:
Salman Khan Niece Actress : अभिनेता सलमान खानचं कुटुंब फिल्म इंडस्ट्रीत आहे माहिती आहे. पण क्वचितच लोकांना माहिती असेल की सलमान खानची भाचीही अभिनेत्री आहे. तिने दोन फिल्ममध्ये कामही केलं आहे. आता तिसऱ्या फिल्ममुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे.
advertisement
1/5
सलमानची भाचीही आहे अभिनेत्री! येतेय तिसरी फिल्म, सौंदर्यात स्टार्सना टक्कर देतेय
अभिनेता सलमान खान याचं संपूर्ण कुटुंब फिल्म इंडस्ट्रीत आहे हे आपल्याला माहितीच आहे. त्याचे वडील, आई, भाऊ, बहीण सगळ्यांचा फिल्म इंडस्ट्रीशी संबंध आहे. इतकंच नव्हे तर सलमानच्या बहिणीचा नवराही अभिनेता आहे. या सगळ्यांना तुम्ही ओळखता. पण तुम्हाला माहिती आहे का? सलमान खानची भाचीही अभिनेत्री आहे.
advertisement
2/5
सलमान खानची भाची जिने दोन फिल्म्समध्ये काम केलं आहे. आता तिची तिसरी फिल्म येणार आहे. त्यामुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे. सौंदर्याच्या बाबतीत सलमानची भाची बड्या बड्या अभिनेत्रींना मागे टाकते.
advertisement
3/5
या अभिनेत्रीचं नाव आहे अलीजेह अग्निहोत्री. सलमानची बहीण फिल्म निर्माती आणि फॅशन डिझाइनर अलविरा आणि अभिनेता, दिग्दर्शक अतुल अग्निहोत्रीची मुलगी.
advertisement
4/5
अलीजेहने 2008 साली लहानपणीच सिनेसृष्टीत पदार्पण केलं. तिच्या वडिलांनी दिग्दर्शित केलेल्या हॅलो फिल्ममध्ये ती दिसली. त्यानंतर वडील आणि मामाची निर्मिती असलेल्या 2023 सालच्या फर्रे फिल्ममध्येही तिने काम केलं आहे. आता ती दिग्दर्शक विकास बहल यांच्या आगामी फिल्ममधून मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. ज्यात ती सिद्धांत चतुर्वेदीसोबत दिसणार आहे.
advertisement
5/5
विकास बहल यांनी 'क्वीन', 'सुपर 30' आणि 'शैतान' यासारख्या फिल्म केल्या आहेत. मीडिया रिपोर्टनुसार आता ते एका लव्हस्टोरीवर काम करत आहेत. ही फिल्म रिअल स्टोरीवर आधारित असल्याचं म्हटलं जातं. फिल्मचं नाव अद्याप ठरलेलं नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
सलमान खानची भाचीही आहे अभिनेत्री! 2 चित्रपटात काम, आता येतेय तिसरी फिल्म, सौंदर्यात Star Actress ना टक्कर देतेय
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल