TRENDING:

अभिनेता संकर्षण कऱ्हाडेच्या घरी Good News! चिमुकल्या पाहुण्याचं आगमन, नाव ट्रेंडपेक्षा एकदमच वेगळं

Last Updated:
Sankarshan Karhade : अभिनेता संकर्षण कऱ्हाडेच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. संकर्षणच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे.
advertisement
1/9
अभिनेता संकर्षण कऱ्हाडेच्या घरी Good News! चिमुकल्या पाहुण्याचं आगमन, नाव ट्रेंडपेक्षा एकदमच वेगळं
अभिनेता संकर्षण कऱ्हाडे सध्या त्याच्या नाटकाच्या दौऱ्यांमुळे चर्चेत आहे. महाराष्ट्रच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरही तो नाटकाचे दौरे करत आहे.
advertisement
2/9
नुकतीच संकर्षणने शेअर केलेली एक पोस्ट चर्चेत आली होती. संकर्षणला रात्री रस्त्यात पोलिसांनी थांबवलं. पोलिसांनी थांबवल्यामुळे संकर्षण घाबरला होता. पण त्यामागचं कारण ऐकून त्यालाही सुखद धक्का बसला. 
advertisement
3/9
ज्या पोलिसांनी रात्री संकर्षणची गाडी थांबवली ते पोलीस त्याचे चाहते होते. त्यांच्याबरोबर फोटो काढण्यासाठी त्यांनी संकर्षणची गाडी थांबवली. संकर्षणने पोलिसांबरोबरचे फोटो देखील पोस्टमध्ये शेअर केलेत. 
advertisement
4/9
दरम्यान संकर्षण कऱ्हाडेच्या घरी आनंदाची बातमी आली आहे. संकर्षणच्या घरी चिमुकल्याचं आगमन झालं आहे. संकर्षणसह त्याची संपूर्ण फॅमिली खुश आहे.
advertisement
5/9
संकर्षणचा लहान भाऊ अधोक्षज कऱ्हाडे दुसऱ्यांदा बाबा झाला आहे. अधोक्षजने सोशल मीडियावर खास पोस्ट लिहित चाहत्यांबरोबर ही बातमी शेअर केली आहे.
advertisement
6/9
संकर्षणच्या भावाचं नाव अधोक्षज हे इतर नावांपेक्षा खूपच वेगळं आहे. त्यामुळे आता त्याच्या मुलाचं नाव काय असेल याची उत्सुकता अनेकांना आहे आहे. अधोक्षजने त्याच्या मुलाचं नाव देखील सांगितलं.
advertisement
7/9
"आता सगळ्यांना उत्सुकता आहे 'अधोक्षज'च्या मुलाचं नाव काय असेल”? ह्याची! नाव ठरवलं आहे. छान आणि अर्थपूर्ण आहे. बारसं झालं की सांगेनच. पण सध्या पाळण्यातलं नाव 'नारायण' ठेवलं आहे! शुभेच्छा आणि आशीर्वाद कायम असूद्या!"
advertisement
8/9
अधोक्षजच्या मुलाचं नाव हे सध्याच्या ट्रेडिंग नावांपेक्षा खूपच वेगळं आहे. नाव ऐकून चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. तसंच बाळाला शुभेच्छा आणि आशीर्वाद दिलेत.
advertisement
9/9
अधोक्षज देखील भाऊ संकर्षणप्रमाणे अभिनय क्षेत्रात काम करतोय. संकर्षण आणि अधोक्षज दिसायला खूप सारखे आहेत. अधोक्षज कऱ्हाडे सध्या झी मराठीवरील 'कमळी' या मालिकेत काम करतोय. त्याचबरोबर 'लाखात एक आमचा दादा', 'पिंकीचा विजय असो' सारख्या मालिकेतही त्याने काम केलं आहे. नुकत्याच आलेल्या 'लाडकी विहिण योजना' या नाटकातही तो काम करतोय. 
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
अभिनेता संकर्षण कऱ्हाडेच्या घरी Good News! चिमुकल्या पाहुण्याचं आगमन, नाव ट्रेंडपेक्षा एकदमच वेगळं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल