TRENDING:

एकेकाळी हॉटेलमध्ये काम करायची 'या' लोकप्रिय मराठी मालिकेची नायिका; फक्त इतकी होती पहिली कमाई

Last Updated:
अनेक अभिनेत्रींनी मालिकाविश्वात येण्यासाठी आणि नाव कमावण्यासाठी संघर्ष केला आहे. यातच मराठीतील एका लोकप्रिय मालिकेच्या नायिकेचाही समावेश आहे. या अभिनेत्रीनं नुकतंच आपल्या पहिल्या कमाईविषयी खुलासा करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.
advertisement
1/8
एकेकाळी हॉटेलमध्ये काम करायची या लोकप्रिय मराठी मालिकेची नायिका
'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेतील नेत्रा म्हणजेच अभिनेत्री तितिक्षा तावडे. ती या मालिकेतून घराघरात लोकप्रिय झाली.
advertisement
2/8
तितिक्षाने या मालिकेआधी अनेक मालिकांमध्ये काम केलं पण तिला 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मधून प्रसिद्धी मिळाली.
advertisement
3/8
पण तितिक्षाने हे नाव कमावण्यासाठी खूप संघर्ष केला आहे. तिने पहिल्या कमाईविषयी खुलासा करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.
advertisement
4/8
तितिक्षा तावडेने एका मुलाखतीत आपल्या पहिल्या कमाईची आठवण सांगितली. तितिक्षाने हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण घेतलं. याचदरम्यान तिला स्टायपेंड म्हणून पहिली कमाई 1000 रुपये मिळाली.
advertisement
5/8
तिने 6 महिने 6000 जमा करून हेअर स्ट्रेट करून घेतले. याविषयी बोलताना तितिक्षाने, 'ती माझी गरज होती आणि मला त्याच्यासाठी आई-बाबांचे पैसे वापरायचे नव्हते.' असा खुलासा केला.
advertisement
6/8
त्यानंतर तितिक्षाने एका प्रसिद्ध फूड चेनच्या आउटलेटसाठी ट्रेनी म्हणून काम केलं. तेव्हा तिला 11,500 पगार मिळत होता. या पगारातून तिने आई- बाबा आणि ताईसाठी कपडयांची खरीदी केली होती.
advertisement
7/8
याविषयी बोलताना तितिक्षा म्हणाली, ''आज 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेमुळे जी प्रसिद्धी आणि प्रेम मिळत आहे. माझा प्रवास पाहून मी त्या काळाच्या तितिक्षाला म्हणेन की "काळजी करू नकोस तू छान करत आहेस. मला तुझा अभिमान आहे! " हे ऐकून तिचे चाहते तिचं खूप कौतुक करत आहेत.
advertisement
8/8
तितिक्षा तावडेचा मोठा चाहतावर्ग आहे. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे, सोबतच ती युट्युब चॅनलमुळे लोकप्रिय आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
एकेकाळी हॉटेलमध्ये काम करायची 'या' लोकप्रिय मराठी मालिकेची नायिका; फक्त इतकी होती पहिली कमाई
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल