पोटासाठी देह विकला, बार डान्सर बनून दिवस काढले, एका निर्णयाने नशीब बदललं, आता गाजवतेय बॉलिवूड
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
एक अशी महिला आहे, जिने तिच्या बिकट परिस्थिवर मात करत इंडस्ट्रीमध्ये यश कमावलं आहे. तिचं बालपण गरिबीत गेलं, परिस्थितीने तिला देह व्यापारात ढकललं. पुढे बार डान्सर म्हणूनही तिने दिवस काढले.
advertisement
1/9

मुंबई: आजकाल सोशल मीडियामुळे प्रसिद्धी मिळवणं सोपं झालंय. पण अशी एक महिला आहे, जिने तिच्या बिकट परिस्थिवर मात करत इंडस्ट्रीमध्ये यश कमावलं आहे. तिच बालपण गरिबीत गेलं, परिस्थितीने तिला देह व्यापारात ढकललं. पुढे बार डान्सर म्हणूनही तिने दिवस काढले, पण लहानपणापासून गोष्टी सांगण्याचं, 'किस्से' रचण्याचं वेड त्यांना थेट मायानगरीत घेऊन आलं. तिथे त्यांनी एकापाठोपाठ एक सुपरहिट चित्रपटांच्या कथा लिहिल्या आणि इम्रान हाश्मी व आदित्य रॉय कपूर सारख्या कलाकारांना स्टार बनवलं! हा प्रवास एखाद्या थरारक सिनेमाच्या कथेपेक्षा कमी नाही.
advertisement
2/9
शागुफ्ता रफीक यांनी 'वो लम्हे', 'मर्डर २', 'जन्नत २', 'आशिकी २', 'जिस्म २' आणि 'राज ३डी' यांसारख्या अनेक अद्भुत चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या आहेत. त्यांनी इतक्या अप्रतिम कथा लिहिल्या त्यामागे त्यांच्या आयुष्यातील खडतर अनुभव होते. त्यांचे आयुष्यच एखाद्या चित्रपटासारखे नाट्यमय होते, म्हणूनच त्या इतक्या प्रभावी कथा लिहू शकल्या.
advertisement
3/9
डीएनए इंडियाच्या रिपोर्टनुसार, शागुफ्ता यांना एका महिलेने दत्तक घेतलं होतं, जिचं कोलकात्यातील एका श्रीमंत उद्योगपतीसोबत संबंध होते. पण त्या उद्योगपतीच्या मृत्यूनंतर, शागुफ्ता यांच्यासह त्या कुटुंबालाही आयुष्यात प्रचंड संघर्ष करावा लागला.
advertisement
4/9
शागुफ्ता जेव्हा अवघ्या ११ वर्षांच्या होत्या, तेव्हा त्यांनी आईला मदत करण्यासाठी खाजगी पार्ट्यांमध्ये डान्स करायला सुरुवात केली. एका रात्रीचे त्यांना ७०० रुपये मिळत असत. अनेकदा तर ५०० रुपयांत त्यांना महिना काढायला लागत असे.
advertisement
5/9
'अल जझिरा' ला दिलेल्या मुलाखतीत शागुफ्ता रफीक यांनी जुन्या दिवसांबद्दल सांगितलं, "मला खूप लवकरच कळलं होतं की महिला किती असुरक्षित असतात. पैसाच ठरवतो की कोण सन्मानास पात्र आहे आणि कोण नाही."
advertisement
6/9
शागुफ्ता जेव्हा १७ वर्षांच्या होत्या, तेव्हा एका श्रीमंत व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये होत्या. या गोष्टीला त्यांनी आपल्या आयुष्यातील सर्वात खालची पातळी मानलं. आयुष्यात स्थिरता मिळावी म्हणून त्या वाईट नात्यात अडकून राहिल्या. जेव्हा त्या तिथून बाहेर पडल्या, तेव्हा त्यांना देह व्यापारात ढकललं गेलं. अखेर, आयुष्यासाठी पैसे कमवण्यासाठी त्यांना बार डान्सर बनावं लागलं.
advertisement
7/9
शागुफ्ताने आपली आपबीती सांगताना म्हटलं, "ते एक दुष्टचक्र होतं. त्यातून बाहेर पडण्यासाठी मी देह व्यापारात अडकले. तिथून सुटण्यासाठी बार डान्सर बनले. मग मुंबईतून पळून दुबईला गेले." इतक्या अडचणी असूनही गोष्टी रचण्याचं, 'किस्से' सांगण्याचं त्यांचं वेड कमी झालं नाही, पण बॉलिवूडमध्ये संधी मिळवणं सोपं नव्हतं.
advertisement
8/9
त्यांना कोणतंही औपचारिक प्रशिक्षण मिळालं नव्हतं. सुरुवातीला अनेक प्रोडक्शन हाऊस आणि टीव्ही शोनी त्यांना नकार दिला. त्या म्हणाल्या, "मी लेखिका म्हणून काम मागण्यासाठी प्रोडक्शन हाऊस, टीव्ही शोजकडे गेले, पण कुणीही मला संधी दिली नाही, कारण मला कोणताही अनुभव नव्हता."
advertisement
9/9
शागुफ्ताचं आयुष्य तेव्हा बदललं, जेव्हा त्या महेश भट्ट यांच्या 'विशेष फिल्म्स' प्रोडक्शन हाऊसशी जोडल्या गेल्या. तिथे त्यांना आपलं टॅलेंट दाखवण्याची संधी मिळाली. त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या. हळूहळू त्यांची लोकप्रियता वाढत गेली आणि आज त्या चित्रपटसृष्टीतील एक मोठं नाव आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
पोटासाठी देह विकला, बार डान्सर बनून दिवस काढले, एका निर्णयाने नशीब बदललं, आता गाजवतेय बॉलिवूड