ना जेठालाल, ना अनुपमा, ना कपिल शर्मा, 'हा' मराठमोळा अभिनेता ठरला TV इंडस्ट्रीतील Highest Paid Actor
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Highest paid TV actor : मराठमोळा अभिनेता, टीव्ही विश्वातील सर्वाधिक मानधन घेणारा कलाकार ठरला आहे. तब्बल ८ वर्षांनंतर तो मालिकेतून पुनरागमन करत आहे.
advertisement
1/7

मनोरंजन विश्वाचं आकर्षण प्रत्येकालाच असतं. या क्षेत्रामुळे प्रसिद्धी आणि ओळख तर मिळतेच, पण त्याचबरोबर अमाप पैसाही मिळतो. याच कारणामुळे कलाविश्वात करिअर करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक मुंबईत येतात. मात्र, खूप कमी लोकांना यश मिळते. या मनोरंजन विश्वात चित्रपट आणि मालिका असे दोन गट आहेत. पण, मानधनाचा विचार केला, तर अनेक टीव्ही कलाकारांचे मानधन अधिक असल्याचं दिसून आलं आहे.
advertisement
2/7
आज आपण अशाच एका कलाकाराबद्दल जाणून घेणार आहोत, जो टीव्ही विश्वातील सर्वाधिक मानधन घेणारा कलाकार ठरला आहे. दिलीप जोशी, रुपाली गांगुली, कपिल शर्मा नाही, तर हा एक मराठमोळा अभिनेता आहे. त्याने आपल्या अभिनयासोबतच आपल्या आवाजाची जादूही पसरवली आहे.
advertisement
3/7
आपल्या वजनदार आवाजाने आणि दमदार अभिनयाने बॉलिवूड आणि टीव्ही दोन्ही क्षेत्रांमध्ये छाप सोडणारा अभिनेता म्हणजे शरद केळकर. 'तान्हाजी' आणि 'बाहुबली'सारख्या भव्य चित्रपटांमुळे लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेला शरद आता तब्बल ८ वर्षांनंतर टीव्हीवर पुनरागमन करतो आहे.
advertisement
4/7
शरद केळकर ‘तुम से तुम तक’ या आगामी मालिकेतून छोट्या पडद्यावर पुन्हा एकदा पदार्पण करणार आहे. शरदच्या नव्या मालिकेबाबत बोलायचं झालं, तर ही मालिका १० तासांच्या फॉरमॅटमध्ये असेल, ज्यामुळे कथा जास्त ठोस आणि दमदार असण्याची अपेक्षा आहे. शरदच्या पुनरागमनामुळे टीव्ही चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे आणि सर्वांनाच त्याला छोट्या पडद्यावर पाहण्याची आतुरता आहे.
advertisement
5/7
या मालिकेसाठी तो दररोज सुमारे ३.५ लाख रुपये मानधन घेत असल्याची चर्चा आहे. यामुळे शरद टीव्ही इंडस्ट्रीत सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांमध्ये सामील झाला आहे. त्याने 'अनुपमा'ची रुपाली गांगुली आणि 'जेठालाल'ची भूमिका साकारणाऱ्या दिलीप जोशी यांच्यासारख्या मोठ्या नावांना मानधनाच्या शर्यतीत मागे टाकलं आहे.
advertisement
6/7
शरद केळकरचा हा प्रवास विशेष आहे. अभिनयाच्या बळावर आणि आपल्या सशक्त आवाजाच्या जोरावर त्याने बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. विशेषतः 'बाहुबली: द बिगिनिंग'मध्ये प्रभासच्या आवाजासाठी शरदने डबिंग केलं होतं, ज्याने प्रेक्षकांवर अमीट छाप सोडली.
advertisement
7/7
त्यानंतर २०२० मध्ये आलेल्या 'तान्हाजी: द अनसंग वॉरियर'मध्ये त्याने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी त्याचं प्रचंड कौतुक झालं. 'तान्हाजी' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल १००० कोटींच्या कमाईचा टप्पा पार केला होता, ज्यामुळे शरद केळकरचं नाव सर्वत्र झळकायला लागलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
ना जेठालाल, ना अनुपमा, ना कपिल शर्मा, 'हा' मराठमोळा अभिनेता ठरला TV इंडस्ट्रीतील Highest Paid Actor