TRENDING:

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता या दिवशी गर्लफ्रेंडसोबत घेणार सात फेरे, शेअर केली वेडिंग डेट

Last Updated:
Marathi Actor : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत विवाहबंधनात अडकणार आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्याने चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे.
advertisement
1/7
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता या दिवशी गर्लफ्रेंडसोबत घेणार सात फेरे
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ खिरीड लवकरच गर्लफ्रेंडसोबत विवाहबंधनात अडकणार आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे.
advertisement
2/7
सिद्धार्थ खिरीडने काही दिवसांपूर्वी 'Single अध्याय संपला' अशी कॅप्शन देत प्रेमाची जाहीर कबुली दिली होती. त्याच्या गुडन्यूजने चाहत्यांना सुखद धक्का बसला होता.
advertisement
3/7
सिद्धार्थने आता लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्याने हटके स्टाइलने वेडिंग डेट जाहीर केली आहे.
advertisement
4/7
सिद्धार्थने 'लॉन्चिंग Soon' असं म्हणत गर्लफ्रेंडसोबतचे फोटो शेअर केले आहे. या फोटोंमध्येच त्यांची वेडिंग डेट दडलेली आहे. 23 जानेवारी 2026 रोजी सिद्धार्थ विवाहबंधनात अडकणार आहे.
advertisement
5/7
सिद्धार्थच्या या पोस्टवर अनेक मराठी सेलिब्रिटींसह चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. प्री-वेडिंगसाठी त्यांनी खास वेस्टर्न लूक केला होता.
advertisement
6/7
सिद्धार्थच्या होणाऱ्या पत्नीचं नाव डॉ. मैथिली भोसेकर आहे. मैथिली ही एक सौंदर्यवती असून 'मिस इंटरनॅशनल वर्ल्ड पेटिट 2022-23' ही स्पर्धा तिने जिंकली होती. तसेच पॅरिस फॅशन वीकमध्येही ती झळकली होती.
advertisement
7/7
सिद्धार्थ खिरीड सध्या 'मुरांबा' या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तसेच 'मुलगी झाली हो','फ्रेशर्स','जाऊबाई जोरात','हृदयी प्रीत जागते' या मालिकांमध्येही त्याने काम केलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता या दिवशी गर्लफ्रेंडसोबत घेणार सात फेरे, शेअर केली वेडिंग डेट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल