TRENDING:

सलमाननं केलं लॉन्च, ऐश्वर्या रायची डुप्लिकेट म्हणून मिळाली ओळख; अचानक इंडस्ट्रीतून कुठे गायब झाली ही अभिनेत्री?

Last Updated:
ऐश्वर्या रायसोबत ब्रेकअपनंतर तिला टक्कर देण्यासाठी सलमान खानने तिच्यासारख्याच दिसणाऱ्या एका अभिनेत्रीला लॉन्च केलं होतं. पण त्यानंतर तिचं करिअर खूपच फ्लॉप झालं. ही अभिनेत्री होती स्नेहा उल्लाल. आज 18 डिसेंबर रोजी स्नेहाचा वाढदिवस आहे. आज ही अभिनेत्री कुठे आहे आणि काय करते जाणून घ्या.
advertisement
1/8
ऐश्वर्या रायची डुप्लिकेट म्हणून मिळाली ओळख; आता काय करते ही अभिनेत्री?
स्नेहा उल्लालचा जन्म 18 डिसेंबर 1987 रोजी ओमान देशातील मस्कत शहरात झाला होता. या ठिकाणी आपले सुरुवातीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर, ती उच्च शिक्षणासाठी मुंबईला आली होती.
advertisement
2/8
याचवेळी स्नेहाची ओळख सलमान खानच्या बहिणीशी, म्हणजेच अर्पिता खानशी झाली होती. अर्पिताची मैत्रीण असल्यामुळे तिला सलमानला भेटण्याचीही संधी मिळाली. यावेळी ऐश्वर्या रॉय आणि स्नेहाच्या चेहऱ्यातील साम्य सलमानच्या लक्षात आलं.
advertisement
3/8
पुढे सलमानने स्नेहाला ‘लकी : नो टाईम फॉर लव्ह’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये लाँच केलं. त्यावेळी तिचे फोटो आणि पोस्टर माध्यमांमध्ये चर्चेचा विषय ठरले होते.
advertisement
4/8
ऐश्वर्या रॉयप्रमाणेच निळे डोळे, आणि तिच्याप्रमाणेच पोझ देऊन काढलेले फोटो, यामुळे ही नवी ऐश्वर्या कोण अशी चर्चा माध्यमांमध्ये आणि फॅन्समध्ये रंगू लागली होती. लकी चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच स्नेहाला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली होती. स्नेहाला केवळ 'ऐश्वर्या रॉयची कॉपी’ म्हणून ओळख मिळाली होती. याविषयी स्नेहाने एकदा खुलासा केला होता.
advertisement
5/8
एका मुलाखतीत याबाबत स्नेहाने अधिक खुलासा केला आहे. ‘ऐश्वर्याची कॉपी अशीच ओळख निर्माण झाल्याचे कधी वाईट वाटले का?’ असे विचारले असता, स्नेहाने तो केवळ प्रचाराचा भाग होता असं उत्तर दिलं.
advertisement
6/8
स्नेहा म्हणाली, ''माझी कोणाशी तुलना केली गेली तर त्याची मला अडचण नाही. सिनेमाच्या पीआरच्या दृष्टीकोनातून मला अगदी ऐश्वर्यासारखंच दाखवण्याचा प्रयत्न केला गेला होता.''
advertisement
7/8
दरम्यान, आपल्या पहिल्या चित्रपटात स्नेहाचा परफॉर्मन्स अगदी साधाच झाला. यानंतर तिला ‘आर्यन’ चित्रपटात देखील काम मिळाले. मात्र, त्यातही तिचा अभिनय अगदी ठीकठाकच झाला. यानंतर आणखी एक-दोन बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केल्यानंतरही म्हणावं असं यश स्नेहाला मिळालं नाही.
advertisement
8/8
त्यानंतर तिने साऊथ इंडस्ट्रीकडे आपला मोर्चा वळवला. टॉलिवूडसोबतच स्नेहा ‘गांधी पार्क’ नावाच्या इंग्रजी, ‘देवी’ या कन्नड आणि ‘मोस्ट वेलकम’ या बंगाली चित्रपटातही दिसली आहे. तिचा शेवटचा हिंदी चित्रपट ‘बेजुबान इश्क’ हा 2015 मध्ये आला होता. त्यानंतर 2020 मध्ये आलेल्या ‘एक्सपायरी डेट’ या वेबसीरीजमध्येही स्नेहा दिसली होती.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
सलमाननं केलं लॉन्च, ऐश्वर्या रायची डुप्लिकेट म्हणून मिळाली ओळख; अचानक इंडस्ट्रीतून कुठे गायब झाली ही अभिनेत्री?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल