Thalapathy Vijay Divorce: 'माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला तर...', थलापथी विजयला संगीताचं अल्टीमेटम
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Thalapathy Vijay-Sangeetha divorce petition: विजयची पत्नी संगीता सोर्णलिंगमने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. या अर्जात संगीताने विजयवर जे आरोप केले आहेत, ते ऐकून साऊथ चित्रपटसृष्टीसह राजकीय वर्तुळातही मोठी खळबळ उडाली आहे.
advertisement
1/10

तमिळ चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार थलापथी विजय (Thalapathy Vijay) सध्या एका मोठ्या वादळात सापडला आहे. गेल्या अनेक वर्षांच्या गॉसिपवर विजयची पत्नी संगीता सोर्णलिंगम हिने अखेर मौन सोडत चेन्नईतील चेंगलपट्टू न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे.
advertisement
2/10
या अर्जात संगीताने विजयवर जे आरोप केले आहेत, ते ऐकून साऊथ चित्रपटसृष्टीसह राजकीय वर्तुळातही मोठी खळबळ उडाली आहे.
advertisement
3/10
विजय आणि संगीता यांचा २५ वर्षांचा संसार आता पूर्णपणे मोडकळीस आला आहे. संगीताने घटस्फोटाच्या अर्जात विजयवर विवाहबाह्य संबंधांचे अत्यंत गंभीर आरोप केले आहेत.
advertisement
4/10
ती म्हणते, "एका लोकप्रिय अभिनेत्रीसोबत विजयचे संबंध आहेत, हे मला २०२१ मध्येच समजलं होतं. मी त्याला जाब विचारला, तेव्हा त्याने ते संबंध तोडण्याचं आश्वासन दिलं. पण त्याने मला केवळ फसवले. तो चोरून त्या अभिनेत्रीसोबत परदेशात फिरू लागला."
advertisement
5/10
इतकंच नाही तर त्या अभिनेत्रीने विजयसोबतचे परदेशातील फोटो सोशल मीडियावर शेअर करून मला आणि माझ्या मुलांना मानसिक त्रास दिला, असा दावाही तिने केला आहे.
advertisement
6/10
संगीताने आपल्या अर्जात म्हटलंय की, जेव्हा तिने विजयच्या या संबंधांना विरोध केला, तेव्हा विजयने तिला घरातच कोणत्याही प्रकारचे अधिकार देणं बंद केलं. तिच्यावर बंधनं लादली गेली आणि तिला अपमानित करण्यात आलं.
advertisement
7/10
गेली दोन वर्षे हे जोडपं एकाच छताखाली राहत असूनही एकमेकांशी बोलत नव्हतं. अखेर मुलांच्या भवितव्यासाठी आणि स्वतःच्या स्वाभिमानासाठी संगीताने लंडनला जाणं पसंत केलं आणि आता अधिकृतपणे घटस्फोटाचा मार्ग स्वीकारला आहे.
advertisement
8/10
संगीताने अर्जात संबंधित अभिनेत्रीचं नाव उघड केलेलं नाही, पण तिने एक कडक इशारा दिला आहे.
advertisement
9/10
ती म्हणते, "विजयाच्या सामाजिक प्रतिमेचा विचार करून मी अद्याप त्या अभिनेत्रीचे नाव घेतलेले नाही. पण जर विजयने माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला, तर मी तिचं नाव जाहीर करेन आणि तिला या खटल्यात दुसरी प्रतिवादी (Respondent) म्हणून सामील करेन." संगीताने विजयकडून पोटगीची मागणीही केली आहे.
advertisement
10/10
विजयने नुकताच 'तमिळगा वेत्री कळघम' (TVK) हा राजकीय पक्ष स्थापन केला असून २०२६ च्या विधानसभा निवडणुकांसाठी तो सज्ज झाला आहे. अशातच त्याच्या खासगी आयुष्यातील हे महाभारत चव्हाट्यावर आल्यामुळे त्याची प्रतिमा डागाळली आहे. विरोधकांसाठी हे मोठं राजकीय भांडवल ठरू शकतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Thalapathy Vijay Divorce: 'माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला तर...', थलापथी विजयला संगीताचं अल्टीमेटम