TRENDING:

'साऊथ सिनेमे का चालतात?' मराठी चित्रपटांच्या मुद्द्यावर वर्षा उसगांवकर कडाडल्या, मुंबईकरांना दाखवला आरसा

Last Updated:
Varsha Usgaonkar: मराठी चित्रपटसृष्टीची 'वंडर गर्ल' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांनी पुन्हा एकदा आपल्या रोखठोक विधानांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
advertisement
1/7
मराठी चित्रपटांच्या मुद्द्यावर वर्षा उसगांवकर कडाडल्या, मुंबईकरांना दाखवला आरसा
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीची 'वंडर गर्ल' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांनी पुन्हा एकदा आपल्या रोखठोक विधानांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. (नितीन नांदुरकर, प्रतिनीधी)
advertisement
2/7
९० च्या दशकात मराठी आणि हिंदी सिनेसृष्टी गाजवणाऱ्या वर्षाताईंनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मराठी भाषेचा अभिमान, दाक्षिणात्य चित्रपटांचे यश आणि 'बिग बॉस मराठी' यावर आपली परखड मतं मांडली आहेत.
advertisement
3/7
वर्षा उसगांवकर म्हणाल्या की, आज विज्ञानाने जग बदललं आहे आणि त्याचे प्रतिबिंब कलेवरही पडले आहे. आजचा मराठी सिनेमा केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता सातासमुद्रापार पोहोचला आहे, त्याला ग्लोबल चकाकी मिळाली आहे.
advertisement
4/7
मात्र, ही प्रगती होत असतानाच त्यांनी एक महत्त्वाची खंत व्यक्त केली. त्या म्हणाल्या, "सर्वात आधी आपल्याला आपल्या भाषेचा अभिमान असायला हवा. दाक्षिणात्य चित्रपट एवढे का चालतात? कारण तिथले लोक ते चित्रपट चालवतात. त्यांना त्यांच्या भाषेचं आणि संस्कृतीचं प्रचंड प्रेम आहे. तेच प्रेम आपण आपल्या मराठी भाषेवर दाखवलं पाहिजे."
advertisement
5/7
मराठी भाषेच्या जोपासनेवर बोलताना त्यांनी मुंबईतील तरुणाईला आरसा दाखवला. त्या म्हणाल्या, "मुंबईच्या मुलांची मराठी भाषा आज कुठे आहे? त्यांना खरोखर मराठी अवगत आहे का, हे बघण्याची वेळ आली आहे. प्रत्येक राज्याने आपली मातृभाषा जोपासली पाहिजे आणि मुंबईसारख्या शहरात राहूनही जर मराठी बोलताना आपण कचरत असू, तर तो चिंतेचा विषय आहे."
advertisement
6/7
मराठी चित्रपटांना आता चांगले दिवस आले आहेत, पण प्रेक्षकांचा पाठिंबा वाढला तर हा प्रवास अधिक वेगाने होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
advertisement
7/7
'बिग बॉस मराठी सिझन ५' मधील वर्षाताईंचा प्रवास प्रचंड गाजला होता. आता सिझन ६ बद्दल बोलताना त्या म्हणाल्या, "सिझन ६ पाहताना मला माझ्या सिझन ५ च्या दिवसांची आठवण नक्कीच येते. सध्याचे सगळेच खेळाडू खूप तगडे वाटत आहेत. प्रत्येकाची खेळण्याची पद्धत वेगळी आहे, पण जुन्या आठवणी मात्र कायम राहतात."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'साऊथ सिनेमे का चालतात?' मराठी चित्रपटांच्या मुद्द्यावर वर्षा उसगांवकर कडाडल्या, मुंबईकरांना दाखवला आरसा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल