Mayank Pawar Death Reason : डिवोर्सनंतर डिप्रेशन, या आजाराशी झुंजत होता मयंक पवार; आईने सांगितलं मृत्यूचं कारण
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Mayank Pawar Death Reason : स्प्लिट्सविला 7 फेम मयंक पवारचं अचानक निधन झालं. फिटनेस गुरू अशी ओळख असलेल्या मयंकला असं काय झालं होतं ज्यामुळे वयाच्या 37 व्या वर्षी त्याने जगाचा निरोप घेतला? त्याच्या मृत्यूचं कारण अखेर समोर आलं आहे.
advertisement
1/8

स्प्लिट्सविला 7 चा स्पर्धक मयंक पवार याचं 23 फेब्रुवारी रोजी निधन झालं. वयाच्या 37 व्या वर्षी मयंकने या जगाचा निरोप घेतला. मयंक पवार हा 6 वेळा मिस्टर इंडिया झाला. फिटनेसच्या जगात त्याने खूप नाव कमावलं होतं. फिटनेस हा त्याचा श्वास होता मग अचानक त्याला काय झालं ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. मयंक पवारच्या मृत्यूचं कारण अखेर समोर आलं आहे.
advertisement
2/8
समोर आलेल्या माहितीनुसार, मयंक पवारच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक अडचणी सुरू होत्या. त्याने त्याचं खासगी आयुष्य नेहमीच लाइमलाइटपासून दूर ठेवलं. मयंकच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, मयंकचं पहिलं लग्न झालं होतं. 2014 मध्ये त्याचा डिवोर्स झाला.
advertisement
3/8
वन इंडियाला दिलेल्या मुलाखतीत मयंकच्या आईनं सांगितलं की, डिवोर्सनंतर मयंक खूप ताण तणावात होता. तो डिप्रेशनमध्ये होता. 2025 साली त्याला लीवर संबंधित आजार झाला होता. तो रुग्णालयात होता. तो पूर्णपणे बरा होऊ शकला नाही.
advertisement
4/8
त्या म्हणाल्या, "माझा मुलगा खूप मेहनती होता. पण डिवोर्सने त्याला आतून पूर्णपणे तोडलं. लीवरच्या आजारानं त्याची तब्येत ढासळली. आम्ही खूप प्रयत्न केले पण..."
advertisement
5/8
मयंकच्या आईने सांगितलं, तो खूप तणावात होता. एकटा पडला होता. खूप उदास असायचा. मयंकच्या मित्राने देखील सांगितलं की तो डिप्रेशनमध्ये होता. तो स्वत:ला ट्रेनिंगमध्ये बिझी ठेवण्याचा प्रयत्न करायचा.
advertisement
6/8
मयंकची तब्येत अचानक बिघडली. त्याला दिल्लीच्या राणा प्रताप बाग येथील घरात राहात होते. त्याचा लीवर खराब झाल्याने त्याचा मृत्यू झाला.
advertisement
7/8
साधारणपणे मिस्टर इंडिया दर्जाची बॉडी बनवण्यासाठी दहा वर्षे लागतात. पण मयंकने दिवसरात्र कठोर परिश्रम करुन फक्त तीन वर्षांत त्याची बॉडी बनवली.
advertisement
8/8
मयंकने 2015 मध्ये मिस्टर इंडिया बॉडीबिल्डिंग चॅम्पियनशिप जिंकली. ही स्पर्धा त्याच्या करिअरसाठी गेम चेंजिंग ठरली. मयंक दिल्लीच्या झोपडपट्टीतून आलेला एका मध्यवर्गीय कुटुंबातील मुलगा होता. मिस्टर इंडिया बॉडीबिल्डिंग चॅम्पियनशिप मिळवणं म्हणजे त्याच्या मेहनतीचं चीज होतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Mayank Pawar Death Reason : डिवोर्सनंतर डिप्रेशन, या आजाराशी झुंजत होता मयंक पवार; आईने सांगितलं मृत्यूचं कारण