'मी बेरोजगार, घरी बसलोय', हिट शो अचानक बंद; सुमीतने सांगितली 'वागळे की दुनिया'नंतरची रिअॅलिटी
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Sumeet Raghavan Wagle Ki Duniya : साडेचार वर्ष सुरू असलेला वागळे की दुनिया हा हिट शो बंद अचानक पडला. वागळे की दुनियानंतर सुमीत राघवन करतो हे त्याने स्वत:च सांगितलं.
advertisement
1/9

अभिनेता सुमित राघवची वागळे की दुनिया ही लोकप्रिय मालिका काही दिवसांआधीच बंद झाली. या मालिकेनं साडेचार वर्ष प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं.
advertisement
2/9

कौटुंबिक मालिका असली तरी ती खूप छान पद्धतीनं प्रेक्षकांसमोर मांडण्यात आली त्यामुळेच मालिकेला प्रेक्षकांचं भरपूर प्रेम मिळालं.
advertisement
3/9
ही मालिका अचानक बंद झाल्यानंतर प्रेक्षकांनीही नाराजी व्यक्त केली. वागळे की दुनिया बंद झाल्यानंतर अभिनेता सुमित राघवन काय करतोय हे त्याने स्वत:च सांगितलं.
advertisement
4/9
पिंकविलाशी बोलताना सुमित म्हणाला, "सध्या मी बेरोजगार आहे. मी घरी बसलोय. घरी बसून म्युझिक ऐकतो. नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करतोय."
advertisement
5/9
"मी तमिळ भाषा शिकतोय. ती माझी भाषा आहे पण मला ती नीट बोलता येत नाही. कोरोनाच्या दिवसात आपण घरी अडकलो होतो तेव्हा एक ऑनलाइन टिचर यायचे आणि ते मला तमिळ शिकावायचे आता ते मी पुन्हा रिवाइज करतोय."
advertisement
6/9
सुमित पुढे म्हणाला, "मी पुन्हा एकदा गाणं शिकायला सुरुवात केली आहे. मला कुकींग करायचं आहे. मी काही कुकींग क्लासेसमध्ये अॅडमिशन घेतोय."
advertisement
7/9
"माझ्या मनात खूप अतृप्त इच्छा होत्या ज्या मला शिकायच्या होत्या. माझ्याकडे कुकींगच्याच जास्तीत जास्त रील्स सेव्ह होतात."
advertisement
8/9
"हे माझं पार्ट टाइम काम आहे. मी घरी असतो तो किचन माझ्या ताब्यात असतं. मी एक एक पदार्थ बनवतो. मला कुकींग खूप आवडतं."
advertisement
9/9
सुमितने सांगितलं, "2019मध्ये मी एका मराठी सिनेमाची निर्मिती केली पण ती काही कारणांमुळे येऊ शकली नाही. 2020मध्ये लॉकडाऊन लागलं त्यामुळे ते राहून गेलं आणि त्यानंतर 2021 पासून वागळे की दुनिया सुरू झालं. त्यात साडेचार वर्ष असेच निघून गेले. मला डायरेक्शन करायचं आहे. पण काही तरी चांगलं यायला पाहिजे."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'मी बेरोजगार, घरी बसलोय', हिट शो अचानक बंद; सुमीतने सांगितली 'वागळे की दुनिया'नंतरची रिअॅलिटी