Ganpati Visarjan 2025: विहिरीत गणपती विसर्जन करणे योग्य आहे का? नेमकं करावं कुठं? ज्योतिषाचा सल्ला
- Published by:Mohan Najan
- Reported by:Prashant Pawar
Last Updated:
गणेशोत्सवातील सर्वात महत्वाचा सोहळा म्हणजे गणेश विसर्जन. परंपरेनुसार गणेश मूर्तीचे विसर्जन नदी, समुद्र किंवा तलावातील वाहत्या पाण्यात केले जाते.
advertisement
1/5

गणेशोत्सवातील सर्वात महत्त्वाचा सोहळा म्हणजे गणेश विसर्जन. परंपरेनुसार गणेश मूर्तीचे विसर्जन नदी, समुद्र किंवा तलावातील वाहत्या पाण्यात केले जाते. वाहते पाणी हे शुद्धीकरण आणि ऊर्जेचा प्रवाह दर्शवित असल्याने त्यामध्ये विसर्जन केल्याने देवत्व निसर्गात विलीन होते, असे मानले जाते. मात्र काही ठिकाणी लोक घरच्या विहिरीत मूर्ती टाकून विसर्जन करतात. पण हे योग्य आहे का? याबद्दलच बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील ज्योतिष रामदेव प्रभू यांनी माहिती दिली आहे.
advertisement
2/5

धार्मिक शास्त्रानुसार विहीर ही घरगुती किंवा पिण्याच्या पाण्याची जागा आहे. त्यामध्ये मूर्ती विसर्जन करणे अपवित्र मानले जाते. प्राणप्रतिष्ठित मूर्ती थेट विहिरीत टाकल्यास त्या पाण्याचा अपमान होतो आणि घरातील लोकांना त्याचे नकारात्मक परिणाम सहन करावे लागतात, असे धर्मग्रंथांमध्ये नमूद आहे. त्यामुळे ज्योतिष तज्ज्ञ विहिरीत विसर्जन न करण्याचा सल्ला देतात.
advertisement
3/5
ज्योतिषशास्त्रातही विहिरीचे स्थान स्थिर जलतत्त्व मानले गेले आहे. विसर्जनासाठी मात्र वाहत्या पाण्याला महत्त्व दिले जाते. वाहत्या पाण्यातील ऊर्जेचा प्रवाह सतत चालत राहतो, त्यामुळे सकारात्मकता वाढते. पण विहिरीसारख्या स्थिर पाण्यात मूर्ती टाकल्यास ऊर्जेचा प्रवाह थांबतो. त्यातून घरात अडचणी, वाद किंवा आर्थिक संकटे वाढण्याची शक्यता असल्याचे ज्योतिषांचे म्हणणे आहे.
advertisement
4/5
पर्यावरणीय दृष्टिकोनातूनही विहिरीत विसर्जन घातक ठरते. विहिरीचे पाणी पिण्यासाठी किंवा घरगुती वापरासाठी असल्याने ते दूषित होते. मूर्तीतील रंग, प्लास्टर वा रसायनांमुळे आरोग्याला धोका निर्माण होतो. त्यामुळे परंपरेबरोबरच पर्यावरणाच्या दृष्टीनेही विहिरीत विसर्जन न करणे आवश्यक आहे.
advertisement
5/5
आजकाल पर्यावरणपूरक उपाय म्हणून घरच्या घरी बादली, टाकी किंवा छोट्या कृत्रिम तलावात मूर्ती विसर्जन करून ते पाणी झाडांना घालण्याची पद्धत लोकप्रिय होत आहे. ज्योतिष तज्ज्ञांच्या मते हीच पद्धत धर्मशास्त्र आणि पर्यावरण दोन्ही दृष्टिकोनातून योग्य आहे. त्यामुळे गणेशभक्तांनी परंपरेचे पालन करताना विहिरीत विसर्जन टाळावे, असा सल्ला दिला जात आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
Ganpati Visarjan 2025: विहिरीत गणपती विसर्जन करणे योग्य आहे का? नेमकं करावं कुठं? ज्योतिषाचा सल्ला