तन्वी कोलते किती बोलते? पहिल्याच 'भाऊच्या धक्क्या'वर रितेशकडून तन्वीची जोरदार कानउघडणी
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Bigg Boss Marathi 6 : 'बिग बॉस मराठी 6'च्या पहिल्याच 'भाऊच्या धक्क्यावर' रितेश देशमुख तन्वी कोलतेची जोरदार कानउघडणी करताना दिसणार आहे.
advertisement
1/7

'बिग बॉस मराठी 6'मध्ये पहिल्या दिवसापासूनच अभिनेत्री तन्वी कोलते चर्चेत आहे. तिच्या वक्तव्यावर नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. घरातील प्रत्येक सदस्यासोबत मोठ-मोठ्याने बोलून तन्वी वाद घालताना दिसत आहे.
advertisement
2/7
तन्वी कोलतेने 'बिग बॉस मराठी 6'चं घर डोक्यावर घेतलं आहे. पहिल्याच आठवड्यात सागर कारंडेला कॉमेडीवरुन हिणवल्याने नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं. पहिल्याच दिवशी ती रुचितासोबत वाद घालताना दिसली होती. दिपाली सय्यदसोबतही तिचं वाजलं आहे.
advertisement
3/7
'बिग बॉस मराठी 6'चं घर तन्वी कोलतेने डोक्यावर घेतलं आहे. कायम मोठ-मोठ्या आवाजात बोलताना ती दिसते. तलवार काढून भांडणासाठी ती नेहमीच सज्ज असते. नेटकऱ्यांकडून मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक सेलिब्रिटींकडूनही तन्वीला ट्रोल केलं जात आहे.
advertisement
4/7
18 जानेवारी 2026 रोजी 'बिग बॉस मराठी 6'चा पहिला भाऊचा धक्का पार पडणार आहे. या भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊ स्पर्धकांची शाळा घेताना दिसेल. नुकताच या एपिसोडचा प्रोमो आऊट झाला असून रितेश देशमुख तन्वीची जोरदार कानउघडणी घेताना दिसत आहे".
advertisement
5/7
प्रोमोमध्ये रितेश देशमुख म्हणतोय,"तन्वी कोलते किती बोलते? तुम्ही आहात या घराच्या 'तंटा क्वीन'. तुम्हाला फक्त बोलायचं असतं, भांडायचं असतं आणि ते झालं की मग रडायचं असतं. तुमच्या जिभेचा ब्रेक फेल झालेला आहे.
advertisement
6/7
तन्वी पुढे रितेशला ब्रेक लावण्याचा प्रयत्न करते. दरम्यान रितेश तिला थांबवत म्हणतो,"मी बोलतोय ना. थांबा एक मिनिट".
advertisement
7/7
'बिग बॉस मराठी 6'च्या या प्रोमोवर तन्वीच्या आवाजामुळे कानाला त्रास होत असल्याच्या कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. तसेच रितेशचे तन्वीची कानउघणी केल्याने 'बिग बॉस मराठी'च्या प्रेक्षकांकडून त्याचंही कौतुक होत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
तन्वी कोलते किती बोलते? पहिल्याच 'भाऊच्या धक्क्या'वर रितेशकडून तन्वीची जोरदार कानउघडणी