निवडणूक वादातून हल्ला: फिर्यादी कल्याणी रामदास धनकुडे (वय ३८, रा. बाणेर) यांच्या नणंद सरला चांदेरे यांचे पती बाणेर परिसरातून निवडणूक लढवत आहेत. धनकुडे कुटुंबीयांनी त्यांना सक्रिय पाठिंबा दिल्याने निम्हण कुटुंबीय नाराज होते. गुरुवारी (१५ जानेवारी) मतदानाची प्रक्रिया सुरू असताना, याच राजकीय वैमनस्यातून आरोपींनी धनकुडे यांच्या 'धनशीला' बंगल्यात प्रवेश केला.
घरात घुसून बेदम मारहाण: आरोपींनी सुरुवातीला धनकुडे यांचे वाहनचालक सचिन फासगे यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर कल्याणी धनकुडे यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत काठीने प्रहार केला. त्यांना वाचवण्यासाठी आलेल्या नवनाथ देशमुख यांनाही टोळक्याने सोडले नाही आणि त्यांनाही काठीने मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात चालक फासगे आणि इतर जण जखमी झाले आहेत.
advertisement
बाणेर पोलिसांनी कल्याणी धनकुडे यांच्या तक्रारीवरून प्रणीत प्रमोद निम्हण, प्रणय प्रमोद निम्हण, प्रसन्न रामभाऊ निम्हण, संदीप नामदेव निम्हण, परवेज शेख आणि इतर साथीदारांविरुद्ध मारहाण, शिवीगाळ आणि बेकायदा जमाव जमवल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. भरदिवसा आणि मतदानाच्या दिवशीच घडलेल्या या राड्यामुळे बाणेर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
