TRENDING:

आता दसऱ्याला घरी आणा SUV, किंमत फक्त 7 लाखांपासून, फिचर्स असे की क्रेटाचा पडेल विसर!

Last Updated:
फ्रेंच कार उत्पादक कंपनीने अखेर भारतात आपली  Citroen Basalt X  नावाची SUV-कूपे कारचं नवीन एडिशन लाँच केलं आहे.
advertisement
1/7
आता दसऱ्याला घरी आणा SUV, किंमत फक्त 7 लाखांपासून, लूक असा क्रेटाचा पडेल विसर
फ्रेंच कार उत्पादक कंपनीने अखेर भारतात आपली  Citroen Basalt X  नावाची SUV-कूपे कारचं नवीन एडिशन लाँच केलं आहे.  हे एक स्पेशल व्हेरियंट आहे. याआधी  ही एसयूव्ही आता आधीच्या गाडीपेक्षा जास्त  स्टायलिश आणि फिचर्सने भरपूर आहे. या एसयूव्हीचं बुकिंगही सुरू झालं आहे.
advertisement
2/7
आता दसऱ्याला घरी आणा SUV, किंमत फक्त 7 लाखांपासून, लूक असा क्रेटाचा पडेल विसर
Citroen Basalt X चं सगळ्यात आकर्षक म्हणजे ऑल-ब्लॅक एक्सटीरिअर आहे. यामध्ये मॅट ब्लॅक रंग दिला आहे. जो आधीपेक्षा जास्त प्रीमियम आणि स्पोर्टी लूक देतो या शिवाय काारमध्ये 16-इंच ड्युल-टोन अलॉय व्हील्स, LED प्रोजेक्टर हेडलाइट्स, रॅम्पअराउंड LED टेललाइट्स आणि स्लोपिंग रूफलाइन दिलं आहे. त्यामुळे मार्केटमध्ये इतर एसयूव्हीपेक्षा ही गाडी वेगळी दिसते.
advertisement
3/7
Citroen Basalt X SUV मध्ये  ब्लॅक आणि ब्राउन डुअल-टोन थीम दिली आहे. या शिवाय लेदरट सीट अपहोल्स्ट्री, एम्बियंट लायटिंग आणि रिअर सीटवर नवीन सेंटर आर्मरेस्टसह कप होल्डर दिलं आहे. डॅशबोर्डवर 3-स्पोक स्टीअरिंग व्हिल आणि क्रोम एक्सेंट्ससह प्रीमियम टच दिला आहे.
advertisement
4/7
या शिवाय Citroen Basalt X SUV मध्ये पुश-बटन स्टार्ट, किलेस एंट्री, क्रूज कंट्रोल, ऑटो-डिमिंग IRVM आणि 360-डिग्री कॅमेरा,  वायरलेस फोन मिररिंग सुरक्षा दिली आहे. शिवाय सेफ्टीसाठी कारमध्ये  6 एअरबॅग, ABS विद EBD, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी आणि 4-स्टार BNCAP क्रॅश टेस्ट रेटिंग (2024) सुद्धा दिले आहे. 
advertisement
5/7
इंजन कसं आहे? Citroen Basalt X SUV मध्ये  1.2-लीटर टर्बो पेट्रोल इंजिन दिलं आहे. जे 108bhp ची पॉवर आणि 190Nm/205Nm टॉर्क जनरेट करते. गियरबॉक्स ऑप्शनमध्ये 6-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड टॉर्क कन्वर्टर ऑटोमॅटिक दिलं आहे. 
advertisement
6/7
किंमत किती? Citroen Basalt X SUV मध्ये एकूण ६ व्हेरिएंट दिले आहे.  Basalt 1.2 NA MT You ची किंमत 7.95 लाख इतकी एक्स शोरूम ठेवली आहे.  त्यापाठोपाठ Basalt X 1.2 Turbo MT Plus 9.42 लाख, Basalt X 1.2 Turbo MT Plus 10.82 लाख,  Basalt X 1.2 Turbo MT Plus – 12.07 लाख, Basalt X 1.2 Turbo MT Max – 11.62 लाख, Basalt X 1.2 Turbo MT Max – 12.89 लाख इतकी किंमत ठेवली आहे.   360-डिग्री कॅमेरा हवा असेल तर 25,000 आणि डुअल-टोन रंगासाठी 21,000 रुपये अतिरिक्त पैसे मोजावे लागतील. 
advertisement
7/7
नव्या Citroen Basalt X चा मुकाबला हा हुंदई क्रेटा, किआ सेल्टोस, मारुती ग्रँड विटारा आणि मारुती विक्टोरिस सारख्या  SUVs ला देणार आहे. 
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
आता दसऱ्याला घरी आणा SUV, किंमत फक्त 7 लाखांपासून, फिचर्स असे की क्रेटाचा पडेल विसर!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल