TRENDING:

4000000000... महाग झाली टीम इंडियाची स्पॉन्सरशीप, एका मॅचमधून BCCI किती कमावणार?

Last Updated:

टीम इंडियाच्या जर्सीवर आता स्वत:चं नाव छापणं आणखी महाग होणार आहे. ऑनलाईन गेमिंग कायद्यामुळे ड्रीम 11 ने टीम इंडियाच्या स्पॉन्सरशीपमधून माघार घेतली, त्यानंतर बीसीसीआयने टीम इंडियाच्या स्पॉन्सरशीपचे रेट वाढवले आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : टीम इंडियाच्या जर्सीवर आता स्वत:चं नाव छापणं आणखी महाग होणार आहे. बीसीसीआयने द्विपक्षीय सीरिजसाठी स्पॉन्सरशीपचे रेट वाढवून 3.5 कोटी रुपये केले आहेत, तर बहुपक्षीय स्पर्धांसाठी हे रेट प्रती मॅच 1.5 कोटी रुपये झाले आहेत. याआधी द्विपक्षीय मॅचसाठी बीसीसीआय 3.17 कोटी रुपये तर बहुपक्षीय मॅचसाठी 1.12 कोटी रुपये घेत होती. ऑनलाईन गेमिंग कायद्यामुळे ड्रीम 11 ने टीम इंडियाच्या स्पॉन्सरशीपमधून माघार घेतली, त्यानंतर बीसीसीआयने टीम इंडियाच्या स्पॉन्सरशीपचे रेट वाढवले आहेत.
4000000000... महाग झाली टीम इंडियाची स्पॉन्सरशीप, एका मॅचमधून BCCI किती कमावणार?
4000000000... महाग झाली टीम इंडियाची स्पॉन्सरशीप, एका मॅचमधून BCCI किती कमावणार?
advertisement

BCCI ला होणार 400 कोटींची कमाई

बीसीसीआयला नव्या स्पॉन्सरशीपमधून 400 कोटी रुपयांपेक्षा जास्तची कमाई व्हायचा अंदाज आहे. सप्टेंबर महिन्याच्या शेवटी संपणाऱ्या आशिया कपनंतर लागू होतील. ड्रीम 11 हटल्यानंतर बीसीसीआयने मंगळवारी स्पॉन्सरशीपसाठीची जाहिरात काढली. 'बोली लावणारी कंपनी जगभरात कुठेही ऑनलाईन मनी गेमिंग, सट्टेबाजी किंवा जुगार सेवा देणाऱ्यांसंबंधी नसावी', असं बीसीसीआयने या जाहिरातीमध्ये स्पष्टपणे नमूद केलं आहे.

advertisement

स्पॉन्सरशिवाय खेळणार टीम इंडिया

टीम इंडिया 9 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आशिया कपमध्ये स्पॉन्सरशिवाय खेळणार आहे, कारण बीसीसीआयने बोली जमा करण्याची शेवटची तारीख 16 सप्टेंबर ठेवली आहे.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
4000000000... महाग झाली टीम इंडियाची स्पॉन्सरशीप, एका मॅचमधून BCCI किती कमावणार?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल