मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील गणेश वाघे 1991 मध्ये जालना जिल्ह्यातील सिंधी काळेगाव येथे स्थायिक झाले. आजोबांची तीन एकर शेती त्यांनी चांगली फुलवली आणि या शेतीच्या जोरावर आणखी सात एकर शेतजमीन वाढवली.
Beed Farmer: वय अवघे 19 वर्ष कमाई मात्र लाखात, बीडमधील शेतकरी नवीन पिढीसाठी ठरतोय आदर्श
यापैकी पाच एकर शेतजमिनीवर ते सध्या शेडनेटची शेती करतात. तब्बल 11 शेडनेट त्यांच्याकडे आहेत. तब्बल 30 ते 50 मजुरांना या माध्यमातून रोजगार दिला जातो. टोमॅटो, मिरची तसेच इतर प्रकारच्या बियाण्यांचे उत्पादन या शेडनेटच्या माध्यमातून घेतलं जातं. आंतरराष्ट्रीय कंपन्यांशी करार करून ही शेती केली जाते.
advertisement
या शेतीच्या बळावर गणेश वाघ यांनी आपल्या तीन मुलांचे उच्च शिक्षण करून त्यांना नोकरीला लावले. तर घरासमोर एक कोटींचा बंगला, दोन अलिशान गाड्या आणि इतर वैभव कमावले. शेती हा तोट्याचा नव्हे तर फायद्याचा व्यवसाय ठरू शकतो हे गणेश वाघ यांनी सिद्ध करून दाखवले. इतर शेतकऱ्यांनी देखील वाघ यांच्याकडून प्रेरणा घेण्याची गरज आहे.
2003 मध्ये पहिल्यांदा शेडनेट शेतीला सुरुवात केली. सुरुवातीलाच तीन ते चार लाखांचे उत्पन्न एका शेडनेटमधून मिळालं. तेव्हापासून हळूहळू ही शेती वाढवत नेली. सध्या दहा एकर पैकी पाच एकर शेतावर पारंपरिक सोयाबीन पीक असून पाच एकर शेतीमध्ये 11 शेडनेट माध्यमातून बीज उत्पादन घेतलं जातं. वर्षाकाठी 30 ते 35 लाखांचे उत्पन्न मिळतं तर 30 ते 40 महिलांना रोजगार दिला जातो, असं गणेश वाघ यांनी लोकल 18 शी बोलताना सांगितलं.