माझा देव चोरला! आईबाबांनंतर अजित दादांनाही गमावलं; पूर्णपणे कोलमडला सूरज चव्हाण
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Suraj Chavan on Ajit Pawar Death : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात दुर्दैवी निधन झालं. त्यांच्या निधनानंतर बिग बॉस मराठी 5चा विजेता सूरज चव्हाण पूर्णपणे कोलमडला.
advertisement
1/11

"दादा माझे देव आहेत. मी कुठेही गेलो तरी दादांचं माझ्याकडे लक्ष असतं" म्हणणाऱ्या सूरज चव्हाणचा देव आज हरपला.
advertisement
2/11
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालं. बारामतीमध्ये सकाळी प्रचारासाठी निघालेले असताना अजित पवारांच्या विमानाचा लँडिंगच्या वेळी स्फोट झाला. या अपघातात अजित पवार यांच्यासह आणखी सहा जणांचा मृत्यू झाला आहे.
advertisement
3/11
अजित पवारांच्या जाण्याने महाराष्ट्राची आणि राजकीय क्षेत्राची कधीही न भरून येणारी हानी झाली आहे. महाराष्ट्रातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचलेल्या नेतृत्वांपैकी एक अजित दादा होते.
advertisement
4/11
बिग बॉस मराठी 5 चा विजेता सूरज चव्हाण आणि अजित दादांचं खास नातं होतं. सूरज चव्हाणला त्याच्या डोक्यावर हक्काचं घर बांधून देण्यात दादांनी लाखमोलाची मदत केली.
advertisement
5/11
सूरजचं घर बांधून देण्यापासून ते पूर्ण झाल्यावर त्याची पाहणी करणं ते त्याच्या हातात घराच्या चाव्या देण्यापर्यंत सगळं अजित दादांनी स्वत: जातीनं पाहिलं होतं.
advertisement
6/11
सूरज चव्हाण अजित दादांना देव म्हणतो. दादांनी त्याच्यासाठी जे केलं त्याचे ऋण तो कधीही फेडू शकत नाही असंही त्यानं सांगितलं होतं. आज अजित दादांच्या निधनाची बातमी ऐकल्यानंतर सूरज चव्हाणवर देखील दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
advertisement
7/11
सूरज चव्हाणने सोशल मीडियावर अजित दादांचा फोटो शेअर करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. या फोटोसह सूरजने माझा आनंद हरपला हे गाणं लावलं आहे. सूरज चव्हाणची ही पोस्ट पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं आहे.
advertisement
8/11
सूरजने त्याच्या पोस्टमध्ये लिहिलंय, "मित्रांनो माझा देव चोरला आज. मित्रांनो मला अजिबात विश्वास होत नाहीये की आपले लाडके कार्यसम्राट अजित दादा आपल्यात नाहीयेत…माझ्यासारख्या गरीब मुलाला त्यांनी इतकं सोन्यासारखं घर बांदून दिलं…माझी काळजी घेतली..मला नवीन आयुष्य मिळवून दिलं."
advertisement
9/11
"अजित दादांसारखा देव माणूस या जगात नाही…याचं मला लई वाईट वाटतय…लई दुःख होतंय. माझ्या आई आप्पा नंतर अजित दादाने माझ्यासाठी इतकं केलं मी आयुष्यभर त्यांची आठवण माझ्या काळजात सांभाळून ठेवेन."
advertisement
10/11
सूरज चव्हाण अजित दादांच्या मतदार संघातील. बिग बॉस मराठी 5 जिंकल्यानंतर अजित दादांनी स्वत: सूरज चव्हाणला भेटायला बोलावलं होतं. सूरज चव्हाण बिग बॉसची ट्रॉफी घेऊन दादांच्या भेटीला गेला होता. तिथेच दादांनी त्याला त्याचं घर बांधून देणार असं आश्वासन दिलं.
advertisement
11/11
दादांचा वादा त्यांनी खरा केला आणि काही महिन्यातच सूरज चव्हाणला त्याचं आलिशान घर बांधून दिलं. घर बांधल्यानंतर दादांनी स्वत: सूरजला घराच्या चाव्या दिल्या होत्या. दादांनी सूरज चव्हाणशी गप्पा मारल्या आणि त्याला पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा देत सोशल मीडियावर फोटो देखील शेअर केले होते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
माझा देव चोरला! आईबाबांनंतर अजित दादांनाही गमावलं; पूर्णपणे कोलमडला सूरज चव्हाण