54 व्या वर्षीही सिंगल मग अचानक कुठून आली तब्बूची मुलगी! करून दिली सगळ्यांशी ओळख, कोण आहे ही?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
अभिनेत्री तब्बू वयाच्या 54 व्या वर्षी सिंगल आहे. मग तिची मुलगी कुठून आली. तिने स्वत: ओळखही करून दिली. तब्बूसोबत असलेली ती मुलगी नक्की कोण आहे?
advertisement
1/8

बॉलिवूडमधील सदाबहार आणि टॅलेंटेड अभिनेत्री तब्बू. तिचं सिनेमातील करिअर हिट झालं. पण वैयक्तिक आयुष्यात तिने कोणालाच येऊ दिलं नाही. तब्बू आज वयाच्या 54 व्या वर्षी अविवाहित आहे. तरीही ती खूप आनंदी आणि नेहमी उत्साही असते.
advertisement
2/8
54 व्या वर्षीही अविवाहित असलेल्या तब्बूचा एक व्हिडीओ समोर आला. ज्यात तिने थेट तिच्या मुलीची ओळख करून दिली. इतके वर्ष सिंगल असलेल्या तब्बूची मुलगी कुठून आली असा प्रश्न सगळ्यांना पडला.
advertisement
3/8
तब्बूने स्वत: तिची सगळ्यांशी ओळख करून दिली. सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत असून अनेकांना प्रश्न पडला आहे की तब्बूची ही मुलगी नेमकी कोण आहे?
advertisement
4/8
1997 साली आलेला 'चाची 420' हा सुपरहिट सिनेमा तुम्हाला आठवत असेल. कमल हासन यांनी यात प्रमुख भूमिका साकारली होती. तब्बू देखील यात महत्त्वाच्या भूमिकेत होते. तब्बूसोबतच सिनेमात अमरीश पुरी, ओम पुरी, परेश रावल यांसारखे दिग्गज कलाकार होते.
advertisement
5/8
जवळपास 2 तास 40 मिनिटांचा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला होता. भारतात सिनेमाने 11.30 कोटी रुपयांचा नेट कलेक्शन तर जगभरात 20.02 कोटी रुपयांची कमाई केली होती.
advertisement
6/8
या सिनेमात तब्बू एका लहान मुलीची आई दाखवण्यात आली होती. हीच मुलगी म्हणजे अभिनेत्री फातिमा सना शेख. फातिमाचा इक्कीस हा सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे. या सिनेमाच्या स्क्रिनिंगला तब्बूने हजेरी लावली होती. तेव्हा फातिमा आणि तब्बूची भेट झाली.
advertisement
7/8
पॅपाराझींना फोटो देताना तब्बूने फातिमा सना शेखकडे इशारा करत हसत सांगितलं, "ही चाची 420 मध्ये माझी मुलगी होती." तब्बूचं हे वाक्य ऐकताच चांगलंच व्हायरल झालं. फातिमा ही तब्बूची खरी नाही तर ऑनस्क्रिन मुलगी आहे. फातिमा सना शेख ही 33 वर्षांच्या आहेत. चाची 420 नंतर तब्बू आणि फातिमा पुन्हा कोणत्याही सिनेमात एकत्र दिसल्या नाहीत.
advertisement
8/8
तब्बूच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर ती लवकरच अजय देवगनसोबत 'दृश्यम 3' मध्ये झळकणार आहेत. हा सिनेमा 2 ऑक्टोबर 2026 रोजी रिलीज होणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
54 व्या वर्षीही सिंगल मग अचानक कुठून आली तब्बूची मुलगी! करून दिली सगळ्यांशी ओळख, कोण आहे ही?