TRENDING:

रोमँटिक कोरियन ड्रामा पाहायला आवडतात? मग OTT वरील हे TOP 5 शो तुमच्या पार्टनरसोबत नक्की पाहा

Last Updated:
Korean Drama Shows OTT : रोमँटिक कोरियन ड्रामा पाहायला आवडत असतील तर ओटीटीवरील हे पाच शो तुमच्या पार्टनरसोबत नक्की पाहा.
advertisement
1/7
कोरियन ड्रामा पाहायला आवडतात? OTT वरील हे टॉप शो पार्टनरसोबत नक्की पाहा
प्लॅटफॉर्मवर विविध जॉनरचा कन्टेंट उपलब्ध आहे. थरार, नाट्य, हॉरर, अॅक्शन या सर्व गोष्टींसह सध्या ओटीटी लवर्सचं लक्ष वेधून घेत आहेत ते के-ड्रामा. गेल्या काही दिवसांमध्ये भारतीय प्रेक्षकांमध्ये कोरियन ड्रामाची क्रेझ चांगलीच वाढली आहे.
advertisement
2/7
रोमँटिक कोरियन ड्रामामध्ये तुम्हाला थ्रिल आणि ट्विस्ट पाहायला मिळेल. जर तुम्हाला रोमँटिक चित्रपट आणि वेब सीरिज पाहण्याची आवड असेल, तर पुढील कोरियन ड्रामा तुमच्यासाठी बेस्ट ठरणार आहेत.
advertisement
3/7
डियर होंगरांग : ओटीटीवरील सर्वोत्कृष्ट रोमँटिक कोरियन ड्रामामध्ये 'डियर होंगरांग' पहिल्या स्थानावर आहे. या ड्रामाची कथा खूपच प्रभावी आहे. यात एका बेपत्ता वारसाची गोष्ट दाखवण्यात आली आहे, जो मोठ्या काळापासून आपल्या कुटुंबापासून दूर असतो. या ड्रामामध्ये रोमांससोबतच थ्रिल आणि सस्पेन्स पाहायला मिळेल. हा शो प्रेक्षकांना नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येईल.
advertisement
4/7
लव्ह स्टक इन द सिटी : 'लव्ह स्टक इन द सिटी' हा शो दुसऱ्या स्थानावर आहे. या ड्रामामध्ये प्रेक्षकांना एक महत्त्वकांक्षी आर्किटेक्ट आणि फ्री-स्पिरिटेड महिलेची गोष्ट दाखवण्यात आली आहे. या ड्रामामध्ये जबरदस्त रोमांच आणि रोमान्स पाहायला मिळतो. हा रोमँटिक कोरियन ड्रामा तुम्ही अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर पाहू शकता.
advertisement
5/7
द ब्राइड ऑफ हा बेक : तिसऱ्या स्थानावर ‘द ब्राइड ऑफ हा बेक’ आहे. हा ड्रामा फँटसी आणि रोमांसने भरलेला आहे. जर तुम्हाला रोमँटिक चित्रपट आणि वेब सीरिज आवडत असतील, तर हा ड्रामा तुम्ही नक्कीच पाहायला हवा.
advertisement
6/7
अ टाइम कॉल्ड यू : ‘अ टाइम कॉल्ड यू’ चौथ्या स्थानावर आहे. या कोरियन ड्रामामध्ये एका मुलीची गोष्ट दाखवण्यात आली आहे, जी आपल्या बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी टाइम ट्रॅव्हल करून भूतकाळात जाते. तिच्या बॉयफ्रेंडचा मृत्यू झालेला असतो, त्यामुळे ती असे करते. हा ड्रामा तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.
advertisement
7/7
मॅरी माय हसबंड : 'मॅरी माय हसबंड' हा ड्रामा पाचव्या स्थानावर आहे. या ड्रामामध्ये एका मुलीची गोष्ट दाखवण्यात आली आहे आहे, जी आपल्या नवऱ्याच्या अफेअरबद्दल सत्य शोधत असते. या ड्रामामध्ये तुम्हाला अनेक भावनिक ट्विस्ट पाहायला मिळतील. हा ड्रामा तुम्ही अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर पाहू शकता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
रोमँटिक कोरियन ड्रामा पाहायला आवडतात? मग OTT वरील हे TOP 5 शो तुमच्या पार्टनरसोबत नक्की पाहा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल