TRENDING:

थलापति विजयसोबत जोडलं नाव, कमेंट करताच फिल्ममेकरवर भडकली; पहिल्यांदाच रिअ‍ॅक्ट झाली तृषा कृष्णन

Last Updated:
अभिनेता विजय आणि तृषा यांच्या अफेअरच्या चर्चांदरम्यान विजयच्या पत्नीने डिवोर्ससाठी कोर्टात धाव घेतली आहे. विजय आणि तृषा एका लग्नात एकत्र दिसले. या सगळ्यावर कमेंट करणाऱ्या फिल्ममेकरवर तृषा कृष्णन चांगलीच भडकली.
advertisement
1/8
थलापति विजयसोबत जोडलं नाव, कमेंट करताच फिल्ममेकरवर भडकली तृषा कृष्णन
अभिनेता थलापति विजय आणि अभिनेत्री तृषा कृष्णन यांचं अफेअर असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. दुसरीकडे विजयला त्याच्या पत्नीने डिवोर्स देण्यासाठी कोर्टात धाव घेतली आहे. डिवोर्सच्या बातम्या येत असताना विजय आणि तृषा एका लग्नात एकत्र दिसले. तिथे त्यांनी इनडायरेक्ट त्यांच्या अफेअरवर शिक्का मोर्तब केल्याचं म्हटलं जात आहे.
advertisement
2/8
दरम्यान या सगळ्या चर्चा सुरू असताना अनेकजण यावर कमेंट करत आहेत. एका प्रसिद्ध फिल्ममेकरनं तृषावर निशाणा साधला. मात्र यावर तृषा चांगलीच भडकली. एकंदरीत संपूर्ण प्रकारावर ती पहिल्यांदा रिअँक्ट झाली.
advertisement
3/8
गलाट्टा अवॉर्ड्स दरम्यान फिल्ममेकर पार्थिबनला तृषा विषयी विचारलं गेलं. याआधी दोघांनी मणिरत्नमच्या पोन्नियिन सेल्वन सिनेमात एकत्र काम केलं होतं. इव्हेंटमध्ये तृषाचा फोटो स्क्रिनवर दाखवण्यात आला. तो पाहून पार्थिबन म्हणाला, या कुंडावईला ( सिनेमातील नाव ) काही दिवस घरीच राहायला पाहिजे. तिच्यासाठी ते चांगलं आहे. तिला बाहेर येऊ देऊ नका.
advertisement
4/8
पार्थिबनचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. हा व्हिडीओ पाहून तृषाने तिच्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत प्रतिक्रिया दिली.
advertisement
5/8
तृषाने पोस्टमध्ये लिहिलंय, "अलीकडे झालेल्या एका कार्यक्रमाच्या आयोजकांनी मला कळवलं की, एका व्यक्तीच्या अस्टिस्टंटकडून आलेल्या विनंतीनुसार शेवटच्या क्षणी माझं नाव आणि फोटो त्या कार्यक्रमात घेण्यात आला."
advertisement
6/8
"माईक हातात असला म्हणून एखादी कमेंट बुद्धिमान किंवा विनोदी होत नाही. तो फक्त मोठ्या आवाजात आपल्या मूर्खपणा लोकांपर्यंत पोहोचवतो. ज्ञानाशिवाय वापरलेले अश्लील शब्द त्या शब्दांचा टार्गेट असलेल्या व्यक्तीबद्दल कमी आणि बोलणाऱ्या व्यक्तीबद्दल जास्त सांगतात."
advertisement
7/8
तृषा कृष्णन आणि विजय चेन्नईमध्ये एका लग्नात एकत्र गेले होते. दोघांनी कपड्यांचं ट्विनिंग केलं होतं. दोघे एकाच गाडीमधून उतरले. दोघांचे नवरा नवरीसोबतचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
advertisement
8/8
विजयच्या पत्नीच्या आरोपांनुसार, विजय आणि तृणा 2021 पाहून एकमेकांबरोबर आहे. अफेअरबाबत विजयच्या पत्नीला कळाल्यानंतर त्याने तिला हे सगळं थांबवण्याचं वचन दिलं होतं मात्र त्याने शब्द पाळला नाही. त्यामुळेच त्याच्या पत्नीने डिवोर्स घेण्याचा निर्णय घेतला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
थलापति विजयसोबत जोडलं नाव, कमेंट करताच फिल्ममेकरवर भडकली; पहिल्यांदाच रिअ‍ॅक्ट झाली तृषा कृष्णन
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल