Sion Flyover च्या उद्घाटनाचा मुहूर्त ठरला, केव्हापासून प्रवाशांच्या सेवेत पुल दाखल होणार?
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
सायन उड्डाणपुलाबद्दलची एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सायन उड्डाणपुल केव्हापासून सुरू होणार आहे? याची माहिती समोर आलीये.
advertisement
1/5

मुंबई शहराला जोडणाऱ्या सायन उड्डाणपुलाच्या उद्घाटनाचा अखेर मुहूर्त सापडला आहे. या उड्डाण पुलाचं काम येत्या काही महिन्यांमध्ये पूर्ण होणार असून काम प्रगतीपथावर सध्या सुरू आहे. अलीकडेच ब्रिजच्या उद्धाटनाचा मुहूर्ताची तारीख समोर आली आहे. ब्रीजच्या उद्धाटनासाठी प्रवाशांना अजून काही काळ वाट पाहावी लागणार आहे.
advertisement
2/5
सायन उड्डाणपुलाचे 15 जुलै 2026 पर्यंत काम पूर्ण करण्याचे आदेश बीएमसीचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले आहे. त्या अनुषंगाने सध्या काम सुरू आहे. या कामामुळे गेल्या काही दिवसांपासून मुंबईकरांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
advertisement
3/5
सायन रेल्वे स्टेशनवरील रेल्वे पुलाच्या पुनर्बांधणीचे काम रेल्वेने पालिकेकडे सोपवले आहे. हा पूल रेल्वेच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवरून जात असल्यामुळे रेल्वेने पुलाच्या पुनर्बांधणीचा प्रस्ताव दिला होता. या कामासाठी येणारा पुनर्बांधणीचा खर्च मध्य रेल्वेमार्फत दिला जाणार आहे.
advertisement
4/5
पुलाच्या पोहोच रस्त्याचे काम करताना काही अडथळे आल्यामुळे मुळ बांधकाम पद्धतीत बदल करण्यात आला आहे. या बदलामुळे प्रकल्प खर्चात वाढ झाली असून याची मध्य रेल्वेकडून मंजुरी घेतली आहे. पूर्वी खर्च 42 कोटी इतका होता. पण आता तोच खर्च 7 कोटीने वाढला असून 49 कोटी 96 लाख 433 रूपयांवर गेला.
advertisement
5/5
या सर्व त्रुटींवर लक्ष देत काम अधिकच वाढू शकते. वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या या सायन रेल्वे पुलाच्या उद्धाटनाला 15 ऑगस्टचा मुहूर्त मिळाला आहे. 15 ऑगस्टपासून हा पूल वाहतुकीपासून खुला होणार असल्याची माहिती पूल विभागाने माहिती दिली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Sion Flyover च्या उद्घाटनाचा मुहूर्त ठरला, केव्हापासून प्रवाशांच्या सेवेत पुल दाखल होणार?