TRENDING:

अंडरवॉटर किसिंग, इंटिमेट सीन्स; बोल्ड सीरिजमुळे गौरव खन्नाची बायको ट्रोल, नेटकऱ्यांना आकांक्षाचं सणसणीत उत्तर

Last Updated:
Akanksha Chamola: आकांक्षाने दिलेले बोल्ड आणि इंटीमेट सीन्स सध्या सोशल मीडियावर वादाचा विषय ठरले आहेत. मात्र, यावरून ट्रोल करणाऱ्यांना तिने सडेतोड उत्तर दिलं आहे.
advertisement
1/8
अंडरवॉटर किसिंग, इंटिमेट सीन्स; बोल्ड सीरिजमुळे गौरव खन्नाची बायको ट्रोल
'बिग बॉस १९' ची ट्रॉफी जिंकून घराघरात पोहोचलेला अभिनेता गौरव खन्ना त्याच्या आयुष्यात मग्न असला, तरी त्याची पत्नी आकांक्षा चमोला मात्र एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. आकांक्षा लवकरच 'दिल, धोखा और डिजायर' या नवीन शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
advertisement
2/8
या शोच्या निमित्ताने तिने दिलेले बोल्ड आणि इंटीमेट सीन्स सध्या सोशल मीडियावर वादाचा विषय ठरले आहेत. मात्र, यावरून ट्रोल करणाऱ्यांना आकांक्षाने अत्यंत व्यावसायिक आणि सडेतोड उत्तर दिलं आहे.
advertisement
3/8
नुकत्याच पार पडलेल्या ट्रेलर लाँच दरम्यान आकांक्षाला तिच्या बोल्ड सीन्सबद्दल विचारण्यात आलं. यावर तिने पडद्यामागील ते गुपित सांगितलं जे अनेकांना माहीत नसतं.
advertisement
4/8
आकांक्षा म्हणाली, "लोकांना वाटतं हे सीन्स करणं सोपं आहे, पण त्यासाठी आता कडक नियम बनले आहेत. आम्ही सेन्सॉरशिपच्या सर्व नियमांचं पालन केलं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, अशा सीन्ससाठी आता इंटीमेसी कोऑर्डिनेटर्स नियुक्त केले जातात."
advertisement
5/8
आकांक्षाने खुलासा केला की, केवळ अभिनयाचीच नाही, तर इंटीमेसीची सुद्धा वर्कशॉप घेतले जाते. तिथे कलाकार एकमेकांसोबत किती कम्फर्टेबल आहेत, हे पाहिलं जातं. "जेव्हा आपण एकमेकांच्या कम्फर्ट झोनचा आदर करतो, तेव्हाच असे सीन्स शूट होतात. आमचे दिग्दर्शक आणि को-स्टार्सनी मला खूप सुरक्षित वाटू दिलं," असंही तिने आवर्जून सांगितलं.
advertisement
6/8
आकांक्षाच्या या बोल्ड अंदाजामुळे सोशल मीडियावर तिला प्रचंड ट्रोल केलं जात आहे. "आकांक्षा गौरवचं नाव खराब करत आहे," इथपासून ते "तारा सुतारिया आणि वीर पहाडिया यांच्यासारखं यांचंही नातं तुटेल," अशा शंका नेटकरी व्यक्त करत आहेत.
advertisement
7/8
गौरव खन्नाने बिग बॉसच्या माध्यमातून आकांक्षाला लाईमलाईटमध्ये आणलं, पण आता तिने अशा भूमिका स्वीकारणं चाहत्यांना रुचलेलं दिसत नाहीये. मात्र, आकांक्षाने स्पष्ट केलंय की, तिला 'ट्रोल क्वीन' म्हटलं तरी काही फरक पडत नाही.
advertisement
8/8
गौरव खन्नाला वडील व्हायचं आहे, मात्र आकांक्षा अद्याप आई बनण्यासाठी किंवा ती जबाबदारी स्वीकारण्यासाठी तयार नाही. तिच्या या भूमिकेमुळेही तिचे चाहते तिच्यावर काहीसे नाराज आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
अंडरवॉटर किसिंग, इंटिमेट सीन्स; बोल्ड सीरिजमुळे गौरव खन्नाची बायको ट्रोल, नेटकऱ्यांना आकांक्षाचं सणसणीत उत्तर
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल