वर्ल्ड कपला 24 तास उरले असताना भारतासाठी वाईट बातमी, गंभीरचा सर्वात विश्वासू खेळाडू स्पर्धेबाहेर जाणार?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
उद्या 7 फेब्रुवारी 2026 पासून टी20 वर्ल्ड कपला सूरूवात होणार आहे. पण या वर्ल्डकपला 24 तास उरले असताना टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे.
advertisement
1/7

उद्या 7 फेब्रुवारी 2026 पासून टी20 वर्ल्ड कपला सूरूवात होणार आहे. पण या वर्ल्डकपला 24 तास उरले असताना टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे.
advertisement
2/7
टीम इंडियाचा स्टार आणि गंभीरचा अत्यंत विश्वासू खेळाडू स्पर्धेबाहेर झाला आहे. त्यामुळे वर्ल्डकप मोहिमेआधीच टीम इंडियाला धक्का बसला आहे.
advertisement
3/7
हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून हर्षित राणा आहे. हर्षित राणा दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या सराव सामन्यात दुखापत झाली होती. या दुखापतीतून तो सारवेल असे वाटत होते.पण तो आता वर्ल्ड कपमधून बाहेर होण्याची शक्यता आहे.
advertisement
4/7
दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या सराव सामन्यात गोलंदाजी करताना हर्षिता राणाला दुखापत झाली होती. तो एका ओव्हर दरम्यान रनअप घेताना दोनदा थांबला, त्यानंतर गुडघा धरून तो मैदानाबाहेर गेला होता. त्याने सामन्यात एक ओव्हर टाकली होती ज्यात त्याने 16 धावा दिल्या होत्या.
advertisement
5/7
दरम्यान राणाच्या दुखापतीबद्दल गुरुवारी पत्रकार परिषदेत बोलताना कॅप्टन सूर्याने चिंता व्यक्त केली होती. हर्षित राणा अद्याप बरा झालेला नाही आहे. फिजिओ त्याच्यावर लक्ष ठेवून आहे, तो अद्याप ठीक दिसत नाही आहे,असे सूर्यकुमार यादवने सांगितले होते.
advertisement
6/7
हर्षित राणाला अद्याप तरी स्पर्धेतून बाहेर करण्याची घोषणा करण्यात आली नाही आहे. पण जर राणा उपलब्ध होऊ शकला नाही तर संघ व्यवस्थापण पर्यायाचा विचार करते आहे.
advertisement
7/7
दरम्यान राणाआधी वॉशिंग्टन सुंदर आणि तिलक वर्मा देखील दुखापतग्रस्त झाले होते. पण वर्ल्ड कप आधी ते फिट असल्याची माहिती आहे. दरम्यान अद्याप तरी राणा स्पर्धेबाहेर गेल्याची घोषणा करण्यात आली आहे. कदाचीत संघ पर्यायी खेळाडू शोधून घोषणा करण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
वर्ल्ड कपला 24 तास उरले असताना भारतासाठी वाईट बातमी, गंभीरचा सर्वात विश्वासू खेळाडू स्पर्धेबाहेर जाणार?