2 विवाहित सुपरस्टार्सशी अफेअर, बायोपिक बनवणाऱ्या बॉयफ्रेंडशी ब्रेकअप, अभिनेत्रीने परदेशात जाऊन भलत्याशीच थाटला संसार
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Bollywood Affairs: बॉलिवूडमध्ये एक अशी अभिनेत्री होती, जिचे नाव दोन विवाहित सुपरस्टार्ससोबत जोडले गेले होते. याशिवाय, त्या अभिनेत्रीचे तिच्या अनेक सह-कलाकारांसोबत प्रेमसंबंध होते, अशाही अफवा होत्या.
advertisement
1/9

'देसी गर्ल' प्रियांका चोप्रा सध्या तिच्या 'वाराणसी' या नव्या दाक्षिणात्य चित्रपटाच्या पुनरागमनामुळे चर्चेत आहे. पण प्रियांकाचं आयुष्य हे केवळ पडद्यावरच्या अभिनयापुरतं मर्यादित नव्हतं.
advertisement
2/9
मिस वर्ल्ड बनण्यापासून ते ग्लोबल आयकॉन होण्यापर्यंतच्या प्रवासात प्रियांकाचं वैयक्तिक आयुष्य नेहमीच एका वादळासारखं राहिलं.
advertisement
3/9
विशेषतः बॉलिवूडमध्ये असताना तिचं नाव अशा बड्या सेलिब्रिटींशी जोडलं गेलं, ज्यामुळे त्या काळी मोठी खळबळ उडाली होती.
advertisement
4/9
प्रियांका चोप्राच्या करियरमध्ये सर्वात जास्त चर्चा झाली ती म्हणजे सुपरस्टार शाहरुख खान आणि अक्षय कुमार यांच्यासोबतच्या तिच्या कथित अफेअरची. अक्षय कुमारसोबत तिने 'अंदाज' आणि 'ऐतराज'सारखे सुपरहिट सिनेमे दिले. मात्र, असं म्हटलं जातं की, या जवळीकीमुळे अक्षयच्या वैयक्तिक आयुष्यात तणाव निर्माण झाला होता. पत्नी ट्विंकल खन्नाने अक्षयला प्रियांकासोबत पुन्हा कधीही काम न करण्याची तंबी दिल्याचं बोललं जातं.
advertisement
5/9
दुसरीकडे, शाहरुख खानसोबतच्या तिच्या केमिस्ट्रीनेही अनेक तर्कवितर्क लावले गेले. जाहिरात क्षेत्रातील दिग्गज प्रल्हाद कक्कर यांनी तर अलिकडेच या नात्याला 'सीरियस आणि प्रायव्हेट' म्हटलं होतं. मात्र, प्रियांकाने नेहेमीच या विषयावर मौन पाळून आपली प्रतिष्ठा जपली.
advertisement
6/9
बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी प्रियांका मॉडेल असीम मर्चंटला डेट करत होती. पण जेव्हा असीमने तिच्या आयुष्यावर बायोपिक बनवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा प्रियांकाने कायदेशीर पाऊल उचलून त्याला रोखलं.
advertisement
7/9
यानंतर तिचं नाव जोडलं गेलं ते हरमन बवेजाशी. तब्बल पाच वर्ष ते एकत्र होते, पण हरमनचा पहिला चित्रपट 'लव्ह स्टोरी २०५०' फ्लॉप झाला आणि हे नातंही संपुष्टात आलं.
advertisement
8/9
प्रियांकाचं नाव अभिनेता शाहिद कपूरसोबतही जोडलं गेलं होतं. एकदा इन्कम टॅक्सच्या छापेमारी दरम्यान शाहिद प्रियांकाच्या फ्लॅटमध्ये सापडल्याने या चर्चांना उधाण आलं होतं.
advertisement
9/9
बॉलिवूडमधील अंतर्गत राजकारण आणि साठमारीला कंटाळून प्रियांकाने आपला मोर्चा हॉलिवूडकडे वळवला. तिथेच तिला भेटला तिचा मिस्टर राईट अमेरिकन सिंगर निक जोनास. निक प्रियांकापेक्षा १० वर्षांनी लहान आहे, पण त्यांच्या प्रेमापुढे हे वयाचं अंतर कधीच आलं नाही. आज प्रियांका आपली मुलगी मालती आणि पती निकसोबत परदेशात सुखी संसार करत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
2 विवाहित सुपरस्टार्सशी अफेअर, बायोपिक बनवणाऱ्या बॉयफ्रेंडशी ब्रेकअप, अभिनेत्रीने परदेशात जाऊन भलत्याशीच थाटला संसार