'मी चमचेगिरी करत नाही याचा अर्थ....', निक्की तांबोळीने उषा नाडकर्णींना सुनावलं, असं नक्की झालं तरी काय?
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Usha Nadkarni-Nikki Tamboli : काही दिवसांपूर्वी उषा नाडकर्णी यांनी एका मुलाखतीत निक्की तांबोळीबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या होत्या. त्यानंतर निक्कीनेही त्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे.
advertisement
1/8

मुंबई: टेलिव्हिजनच्या जगात वाद आणि मतभेद काही नवीन नाहीत. पण जेव्हा दोन अभिनेत्री एकमेकींवर जाहीरपणे टीका करतात, तेव्हा ती बातमी होते.
advertisement
2/8
आता असंच काहीसं ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी आणि अभिनेत्री निक्की तांबोळी यांच्यात घडलं आहे. उषा नाडकर्णी यांनी निक्कीला ‘अहंकारी’ म्हटल्यानंतर निक्कीनेही त्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे.
advertisement
3/8
काही दिवसांपूर्वी उषा नाडकर्णी यांनी एका मुलाखतीत निक्की तांबोळीबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या होत्या. त्या दोघी ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ या शोमध्ये एकत्र होत्या.
advertisement
4/8
मुलाखतीत निक्की तांबोळीबद्दल विचारल्यावर उषा नाडकर्णी म्हणाल्या, “मला वाईट गोष्टी आवडत नाहीत. मला निक्कीचा राग नाही, पण ती खूप मोठी आहे. आम्ही सगळे लहान आहोत. मी मोठ्या लोकांशी जास्त बोलत नाही, कारण ते बोलत नाहीत. ते आमच्यात मिसळत नाहीत.”
advertisement
5/8
उषा नाडकर्णी यांनी या अप्रत्यक्षपणे निक्कीच्या स्वभावावर आणि तिच्या अहंकारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यामुळे निक्कीचे चाहतेही नाराज झाले होते.
advertisement
6/8
उषा नाडकर्णींच्या या वक्तव्यानंतर निक्की तांबोळीनेही आता ‘आयएएनएस’ला दिलेल्या मुलाखतीत यावर प्रतिक्रिया दिली आहे. ती म्हणाली, “मी जशी आहे तशीच आहे आणि मी थेट गोष्टी बोलते, पण यामुळे मी अहंकारी होत नाही. मी कधीही ढोंग केलं नाही आणि माझ्या चाहत्यांना मी याच कारणासाठी आवडते.”
advertisement
7/8
ती पुढे म्हणाली, “माझा उषाजींबद्दल खूप आदर आहे. पण तुम्ही मोठ्या आहात आणि मी तुमची चमचेगिरी करत नाही किंवा प्रत्येक गोष्टीला ‘हो’ म्हणत नाही, याचा अर्थ असा नाही की तुम्ही माझ्याबद्दल काहीही बोलू शकता. मला जज करण्याचा अधिकार कोणालाही नाही.”
advertisement
8/8
निक्कीने स्पष्टपणे सांगितलं की, तिला आपलं व्यक्तिमत्त्व माहीत आहे आणि तिच्या चाहत्यांनाही ती कशी आहे, हे माहीत आहे. तिने पुन्हा एकदा उषा नाडकर्णी यांचा आदर व्यक्त केला, पण त्याचसोबत त्यांना खडसावूनही सांगितलं. यावरून हे स्पष्ट होतं की, 'सेलिब्रिटी मास्टरशेफ'च्या सेटवर या दोघींमध्ये काहीतरी घडलं होतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'मी चमचेगिरी करत नाही याचा अर्थ....', निक्की तांबोळीने उषा नाडकर्णींना सुनावलं, असं नक्की झालं तरी काय?