6 महिने आरशात तोंड पाहिलं नाही, मरीन ड्राइव्ह ते वांद्रे चालत गेली; विद्या बालनसोबत नेमकं काय घडलं?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Vidya Balan Struggle : आज प्रेक्षकांच्या मनात आपल्या अभिनयानं वेगळं स्थान मिळवणारी विद्या कधीकाळी स्वत:चा चेहरा आरशात पाहायला तयार नव्हती. तब्बल 6 महिने तिने स्वत:ला आरशात पाहिलं नव्हतं. विद्यासोबत नेमकं काय घडलं होत?
advertisement
1/9

कलाकारांच्या आयुष्यात चढ उतार हे नेहमीच येत असतात. अनेकांचं करिअर सुरुवातीला व्यवस्थित सुरू असतं. नंतर मात्र काम मिळवण्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत करावी लागते.
advertisement
2/9
मेहनत आणि संघर्ष करून आपलं नाव कमावणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे विद्या बालन. पण एक काळ असा होता जेव्हा विद्याने तब्बल 6 महिने स्वत:चं तोंड आरशात पाहिलं नव्हतं. मरीन ड्राइव्ह ते वांद्रे ती पायी चालत गेली होती. विद्याच्या आयुष्यातील हा खडतर प्रसंग काय होता? विद्यासोबत नेमकं काय घडलं होतं?
advertisement
3/9
विद्या बालन हिने केवळ 16 वर्षांची असताना 'हम पांच' या एकता कपूरच्या मालिकेमधून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले. तिने राधिकाची भूमिका साकारून प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. लहानपणापासूनच शबाना आझमी आणि माधुरी दीक्षित विद्याचे आदर्श होते.
advertisement
4/9
विद्याने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, तिला एकदाच मोठी संधी मिळाली होती. दाक्षिणात्य सुपरस्टार मोहनलाल यांच्या 'चक्रम' या सिनेमासाठी तिला निवडण्यात आलं होतं. पण दुर्दैव असं की, एक दिवसाच्या शूटिंगनंतर डायरेक्टर कमल आणि मोहनलाल यांच्यात वाद झाला आणि संपूर्ण चित्रपट बंद पडला.
advertisement
5/9
या एका चित्रपटाच्या घोषणेनंतर विद्याने साउथमधील 12 सिनेमे साइन केले होते. मात्र त्या काळात लिखित करार नसायचे त्यामुळे सर्व सिनेमांतून तिला नंतर बाहेर काढण्यात आलं. एक-दोन नव्हे तर 13 प्रोजेक्ट्स तिच्या हातून गेले.
advertisement
6/9
विद्याने सांगितलं, "काही निर्माते सुरुवातीला मला आश्वासन द्यायचे आणि नंतर रिप्लेस करायचे. एका निर्मात्याने माझ्या तोंडावर सांगितलं की तू सुंदर दिसत नाहीस. त्याच्या त्या बोलण्याने माझ्या मनावर खोलवर परिणाम झाला."
advertisement
7/9
त्या प्रसंगानंतर विद्याने 6 महिने स्वत:चं तोंड आरशात पाहिलं नाही. तिचा आत्मविश्वास डळमळीत झाला होता. "हा काळ माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट काळ होता", असं ती म्हणते.
advertisement
8/9
विद्याने दिग्दर्शक के. बालचंदर यांच्यासोबत दोन चित्रपट साइन केले होते. या सिनेमांचे शूटिंग न्यूझीलंडमध्ये होणार होतं. पण एकेदिवशी तिला कळलं की, या प्रोजेक्ट्समधून तिला वगळण्यात आलं आहे. हे ऐकताच तिने बालचंदर यांच्या मुलीला फोन केला आणि हे खरं आहे कळल्यावर ती रडत बसली.
advertisement
9/9
विद्याने सांगितलं, "मी मरीन ड्राइव्ह ते वांद्रे पायी चालत गेले, रडत रडत… माझं काहीच उरलं नव्हतं. स्वप्नं मोडली होती, आत्मविश्वास संपला होता." पण आज हीच विद्या बालन बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेत्री मानली जाते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
6 महिने आरशात तोंड पाहिलं नाही, मरीन ड्राइव्ह ते वांद्रे चालत गेली; विद्या बालनसोबत नेमकं काय घडलं?