TRENDING:

विक्रम गोखले यांच्या निधनाच्या 3 वर्षांनी त्यांचा शेवटचा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला, हृदयस्पर्शी पोस्टर समोर

Last Updated:
Vikram Gokhales Last Film : दिवंगत अभिनेते विक्रम गोखले यांचा शेवटचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमाचं पोस्टर नुकतंच रिलीज झालं आहे.
advertisement
1/8
विक्रम गोखले यांच्या निधनाच्या 3 वर्षांनी त्यांचा शेवटचा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला, हृदयस्पर्शी पोस्टर समोर
मराठी रंगभूमी, मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतील महान अभिनेते, दिवंगत विक्रम गोखले यांचा अखेरचा चित्रपट आता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
advertisement
2/8
अतिशय हृदयस्पर्शी कथा असलेला 'बेवारस' हा चित्रपट आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर या चित्रपटाचं पोस्टर लाँच करण्यात आलं आहे.
advertisement
3/8
या चित्रपटात विक्रम गोखले यांच्यासह तेजस्विनी पंडित, रोहिणी हट्टंगडी, उषा नाईक, निहार गिते, ऋतुजा बागवे, उदय टिकेकर, विद्याधर जोशी, श्रीजित मराठे, आदित्य देशमुख यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
advertisement
4/8
डोळे भरून आलेल्या विक्रम गोखले यांनी एका लहान मुलाला मिठी मारल्याचं चित्र पोस्टरवर आहे. पोस्टरप्रमाणेच चित्रपटाची कथा अत्यंत हृदयस्पर्शी आहे.
advertisement
5/8
अनाथालय चालवणाऱ्या तत्त्वनिष्ठ आबाजींची भूमिका विक्रम गोखले यांनी साकारली आहे. एक लहान अनाथ मुलगा आपल्या अधिकारांसाठी आपल्याच आई वडिलांना कोर्टात का खेचतो? त्या लहान मुलाच्या संघर्षाची अनोखी कथा या चित्रपटात दाखविण्यात आली आहे.
advertisement
6/8
त्याचबरोबर सोबत सामाजिक परिस्थितीचा पदरही या कथानकाला आहे. त्यामुळे विक्रम गोखले यांची अखेरची कलाकृती असलेल्या या चित्रपटाविषयी आता उत्सुकता निर्माण झाली आहे.
advertisement
7/8
चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप समोर आलेली नाही. पण पोस्टरने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. प्रेक्षकांनी विक्रम गोखले यांचा शेवटचा सिनेमा पाहण्यासाठी उत्सुकता दाखवली आहे. सिनेमाची रिलीज डेट लवकरच जाहीर केली जाणार आहे.
advertisement
8/8
26 नोव्हेंबर 2022 रोजी विक्रम गोखले यांचं निधन झालं. वयाच्या 77 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. आता त्यांच्या निधनाच्या 3 वर्षांनी त्यांची शेवटची कलाकृती प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
विक्रम गोखले यांच्या निधनाच्या 3 वर्षांनी त्यांचा शेवटचा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला, हृदयस्पर्शी पोस्टर समोर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल