'परदेसी परदेसी जाना नहीं' म्हणणारी 'राजा हिंदुस्तानी'ची ही हिरोईन स्वत: कुठे गेली?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Raja Hindustani Pardesi Pardesi Song Actress : 'राजा हिंदुस्तानी' फिल्ममध्ये करिश्मा कपूर मुख्य भूमिकेत असली तरी फिल्ममधील 'परदेसी परदेसी' गाण्यात थिरकणाऱ्या या अभिनेत्रीने हे विशेष छाप सोडली होती. पण यानंतर मात्र ही अभिनेत्री दिसली नाही.
advertisement
1/7

राजा हिंदुस्तानी फिल्ममधील परदेसी परदेसी जाना नही हे गाणं तुम्हाला नक्कीच आठवत असेल. या गाण्याने प्रेक्षकांच्या मनावर अशी छाप सोडली की जेव्हा जेव्हा एखादी प्रिय व्यक्ती सोडून जायची तेव्हा लोक हे गाणं म्हणून तिला थांबवण्याचे प्रयत्न करायचे.
advertisement
2/7
फिल्ममध्ये करिश्मा कपूर आणि आमिर खान हे मुख्य भूमिकेत होते तरी या गाण्यात मात्र या गाण्यावर नाचणाऱ्या अभिनेत्रीने एक खास छाप सोडली. फक्त या एका गाण्याच्या जोरावर ही अभिनेत्री प्रसिद्ध झाली. पण आता मात्र ही अभिनेत्री बॉलिवूडमधून अचानक गायब झाली आहे. ती कुठे दिसत नाही.
advertisement
3/7
परदेसी गाण्यावर थिरकणाऱ्या या अभिनेत्रीच नाव आहे प्रतिभा सिन्हा. प्रसिद्ध अभिनेत्री माला सिन्हा यांची ती मुलगी. प्रतिभाचा जन्म 4 जुलै 1969 रोजी कोलकाता इथं झाला. 1992 साली आलेला ‘मेहबूब मेरे मेहबूब’ ही तिची पहिली फिल्म. त्यानंतर तिने दिल है बेताब, मिलिटरी राजा, तू चोर में सिपाही, कल की आवाज, पोकिरी राजा, ले चल अपना संग, राजा हिंदुस्तानी अशा फिल्ममध्ये काम केलं.
advertisement
4/7
पण राजा हिंदुस्तानी फिल्ममधील परदेसी परदेसी गाण्याने तिला बॉलीवूडचा स्टार बनवलं. त्यानंतर मात्र ही अभिनेत्री दिसली नाही. कारण ती एका विवाहित पुरुषाच्या प्रेमात पडली. कारकिर्दीच्या शिखरावर असताना प्रतिभा संगीतकार नदीम सैफीच्या प्रेमात पडली. नदीम आधीच विवाहित होता. त्यामुळे तिची आई मालाची या नात्याला मंजुरी नव्हती. मालाने प्रतिभाला तिच्या करिअरवर लक्ष केंद्रीत करण्याचा आग्रह केला, पण तिने चित्रपटांच्या शूटिंगपेक्षा नदीमसोबत जास्त वेळ घालवला.
advertisement
5/7
असं म्हटलं जातं की नदीम आणि प्रतिभा कोड वर्डमध्ये संवाद साधत असत. प्रतिभाचं कोड नेम 'अ‍ॅम्बेसडर' होतं आणि नदीमचं 'एस' होतं. जेव्हा हे प्रकरण मीडियापर्यंत पोहोचलं तेव्हा प्रतिभाने नदीमसोबतचे तिच्या नात्याची कबुलीही दिली. तेव्हा माला सिन्हा तिच्यावर खूप रागावल्या आणि त्यांनी प्रतिभाला नदीमपासून दूर करण्यासाठी चेन्नईला पाठवलं.
advertisement
6/7
चेन्नईला जाऊनही प्रतिभा आणि नदीम भेटत राहिले आणि या काळात प्रतिभाने एका मुलाखतीत सांगितलं की ती नदीमशी लग्न करेल. त्यानंतर मालाने नदीमच्या घरी फोन करून त्याला शिवीगाळ केली, पण प्रतिभाने तिच्या आईच्या वतीने माफी मागितली. पण त्यानंतर प्रतिभाने एका मुलाखतीत नदीमशी लग्न करण्यास नकार दिल्याचं सांगितलं.
advertisement
7/7
एका हत्या प्रकरणात नदीमचं नाव समोर आल्यानंतर तो देश सोडून गेला आणि प्रतिभाला याचा फटका सहन करावा लागला, कारण तिचं नाव नदीमशी बराच काळ जोडले गेले होते. तेव्हापासून प्रतिभा चित्रपटसृष्टीपासून दूर गेली आहे आणि मुंबईत तिच्या आईसोबत राहते. (फोटो : सोशल मीडिया)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'परदेसी परदेसी जाना नहीं' म्हणणारी 'राजा हिंदुस्तानी'ची ही हिरोईन स्वत: कुठे गेली?