हिवाळ्यात बामचा वापर का वाढतो?
थंडीमुळे स्नायूंमध्ये वेदना व अंगदुखी वाढते. सर्दी, नाक बंद होणे, डोके जड वाटणे. थंड हवेमुळे सांधेदुखी व पाठदुखीचा त्रास होणे. रात्री झोप न लागणे किंवा डोकेदुखी या त्रासांवर घरगुती उपाय म्हणून बामचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.
शेफचे काम सोडले, उभारला अनोखा कॅफे, तरुणाची महिन्याला इतकी कमाई
advertisement
दररोज बाम लावण्याचे फायदे
1. बाममध्ये असलेले मेंथॉल, कापूर, युकॅलिप्टस तेल यामुळे स्नायू व सांधेदुखीवर तात्काळ आराम मिळतो.
2. कपाळावर किंवा मानेवर थोड्या प्रमाणात बाम लावल्यास ताण कमी होऊन डोकेदुखी कमी होते.
3. छाती किंवा नाकाजवळ बाम लावल्यास श्वास घेणे सुलभ होते.
4. हिवाळ्यात शरीर सुस्त वाटत असल्यास बाममुळे उबदारपणा जाणवतो.
दररोज बाम वापरण्याचे संभाव्य तोटे
1. त्वचेवर जळजळ व ॲलर्जी होणे. अति वापरामुळे त्वचा लाल होणे, खाज सुटणे किंवा जळजळ होऊ शकते. विशेषतः संवेदनशील त्वचेमध्ये या समस्या जास्त प्रमाणात आढळतात.
2. त्वचा कोरडी होण्याचा धोका असतो. काही बाममधील रसायनांमुळे त्वचेतील ओलावा कमी होतो.
3. तसेच सवय लागण्याची शक्यता असते. डोकेदुखी किंवा अंगदुखी झाली की लगेच बाम लावण्याची मानसिक सवय लागू शकते.
4. लहान मुलांसाठी धोकादायक ठरू शकते. जास्त प्रमाणात किंवा चुकीच्या पद्धतीने वापर केल्यास लहान मुलांना श्वसनाचा त्रास होऊ शकतो.
तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, बाम लावल्याने मूळ कारणावर उपचार होत नाही. बाम तात्पुरता आराम देतो, मात्र वेदनेचे मूळ कारण तसेच राहते. बामचा वापर मर्यादित आणि गरजेपुरताच करावा. जखम, डोळे किंवा नाकाच्या आत बाम लावू नये. दीर्घकाळ वेदना असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. लहान मुलांवर बाम वापरण्याआधी विशेष काळजी घ्यावी.





