Who is Ashish Kapoor: कोण आहे आशिष कपूर? महिलेसोबत वॉशरुममध्ये गैरवर्तन प्रकरणात अभिनेत्याला अटक
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Who is Ashish Kapoor : लोकप्रिय टीव्ही अभिनेता आशिष कपूर सध्या अडचणीत सापडला आहे. त्याला पुण्यातून अटक करण्यात आली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे? आणि हा अभिनेता कोण आहे? याविषयी जाणून घेऊया.
advertisement
1/7

लोकप्रिय टीव्ही अभिनेता आशिष कपूर सध्या अडचणीत सापडला आहे. बलात्कार प्रकरणी त्याला पुण्यातून अटक करण्यात आली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे? आणि हा अभिनेता कोण आहे? याविषयी जाणून घेऊया.
advertisement
2/7
आशिष कपूर प्रसिद्ध अभिनेता असून त्याने ‘देखा एक ख्वाब’ आणि ‘देवों के देव... महादेव’ सारख्या मालिकांमधून मोठी लोकप्रियता मिळवली होती. तो सध्या गंभीर आरोपांमुळे चर्चेत आहे. दिल्ली पोलिसांनी त्याला पुण्यातून अटक केली आहे.
advertisement
3/7
आशिष कपूरवर आरोप आहे की ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात दिल्लीत झालेल्या एका घरगुती पार्टीदरम्यान त्याने एका महिलेसोबत बळजबरी केली. पीडितेच्या तक्रारीनुसार, वॉशरूममध्ये हा प्रकार घडला.
advertisement
4/7
एफआयआरमध्ये सुरुवातीला आशिष, त्याचा मित्र, मित्राची पत्नी आणि दोन अनोळखी व्यक्तींची नावे होती. मात्र, चौकशीत पीडितेने स्पष्ट केले की तिच्यावर बलात्कार फक्त आशिष कपूरनेच केला.
advertisement
5/7
आशिष कपूरचा जन्म आणि शिक्षण दिल्लीमध्ये झाले. शालेय जीवनातच त्याला अभिनयाची आवड निर्माण झाली. सुरुवातीला त्याने मॉडेलिंग आणि थिएटरमध्ये काम करून ओळख मिळवली. त्यानंतर मुंबई गाठत त्याने मालिकांमधून पाऊल ठेवले.
advertisement
6/7
2011 मध्ये त्याने ‘दिल जंगल और भी है’ मधून टीव्हीवर पदार्पण केले. पण खरी लोकप्रियता मिळाली ‘देखा एक ख्वाब’ या मालिकेतून, ज्यात त्याने युवराज उदयवीर सिंहची दमदार भूमिका साकारली.
advertisement
7/7
एकेकाळचा हा लोकप्रिय अभिनेता आता गंभीर गुन्ह्याच्या आरोपामुळे चर्चेत आला आहे. दिल्ली पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले असून पुढील चौकशी सुरू आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Who is Ashish Kapoor: कोण आहे आशिष कपूर? महिलेसोबत वॉशरुममध्ये गैरवर्तन प्रकरणात अभिनेत्याला अटक