कोण आहे प्रीतिका राव, जिने को-स्टारवरच केले शरीरसंबंधांचे आरोप? म्हणाली 'तो प्रत्येक मुलीसोबत...'
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Preetika Rao Controversy : अभिनेत्री प्रीतिका राव वादात अडकली आहे. 'बेइंतहा' मालिकेतील सहकलाकार हर्षद अरोरावर गंभीर आरोप केले आहेत, ज्यामुळे सोशल मीडियावर उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
advertisement
1/7

एकेकाळी टीव्हीच्या छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाने आणि गोड रूपाने घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्रीतिका राव सध्या एका गंभीर वादात अडकली आहे. ‘बेइंतहा’ या प्रसिद्ध हिंदी मालिकेतील तिची आणि अभिनेता हर्षद अरोरा यांची जोडी प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली होती.
advertisement
2/7
अनेक चाहते आजही या दोघांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीचे कौतुक करताना दिसतात. पण अलीकडेच घडलेल्या एका प्रसंगानं हे नातं वेगळ्याच वळणावर पोहोचले आहे. घटनेची सुरुवात झाली एका चाहत्याच्या सोशल मीडिया पोस्टपासून.
advertisement
3/7
एका फॅन पेजने ‘बेइंतहा’ या मालिकेतील प्रीतिका आणि हर्षद यांचा एक रोमँटिक सीन क्लिप शेअर केली. मात्र, हे पाहून प्रीतिका संतापली आणि तिने थेट त्या फॅन पेजवर जाऊन त्यांना खडेबोल सुनावले. तिने स्पष्टपणे लिहिले की, “माझ्या परवानगीशिवाय अशा क्लिप्स पोस्ट करू नका. मी तुमच्याकडे अनेकदा विनंती केली आहे. ह्या सीन फक्त स्क्रिप्टचा भाग होते.”
advertisement
4/7
प्रीतिका एवढ्यावरच थांबली नाही. तिने एक अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आरोप करत लिहिले, “असा माणूस जो इंडस्ट्रीतील प्रत्येक बाईसोबत झोपतो, त्याच्यासोबत माझे कोणतेही व्हिडीओ पोस्ट करू नका!” तिच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात उलटसुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या. काहींनी तिच्या धाडसाचे कौतुक केले तर काहींनी तिच्या भाषेचा निषेध केला.
advertisement
5/7
प्रीतिका पुढे म्हणाली, “तुम्ही माझ्या इच्छेविरुद्ध हे करत आहात, त्यामुळे त्याचे परिणाम तुम्हालाच भोगावे लागतील. तुम्हाला लाज वाटली पाहिजे.” या पोस्टनंतर नेटकऱ्यांमध्ये चांगलाच खळबळ उडाली आहे. अनेकांनी विचारले की प्रीतिकाने इतक्या वर्षांनंतर असा आरोप का केला? काहींनी या पोस्टला ‘पब्लिसिटी स्टंट’ म्हणूनही हिणवले.
advertisement
6/7
प्रीतिका राव ही अभिनेत्री अमृता रावची बहीण आहे. अमृताने ‘विवाह’सारख्या चित्रपटांतून लोकप्रियता मिळवली तर प्रीतिकाने ‘बेइंतहा’, ‘लव का है इंतजार’, ‘लाल इश्क’ यांसारख्या मालिकांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. अभिनय क्षेत्रात ती नेहमीच सौम्य आणि शांत स्वभावाची मानली जात होती. त्यामुळे तिचा अचानक असा स्फोट अनेकांसाठी धक्कादायक ठरला आहे.
advertisement
7/7
सध्या हर्षद अरोराने या आरोपांवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण ही बाब केवळ वैयक्तिक मतभेदांपुरती मर्यादित आहे की यामागे काही गंभीर सत्य आहे, हे वेळच ठरवेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
कोण आहे प्रीतिका राव, जिने को-स्टारवरच केले शरीरसंबंधांचे आरोप? म्हणाली 'तो प्रत्येक मुलीसोबत...'