Evergreen Rekha: कोण आहे रेखाची मुलगी? जी अभिनेत्रीला म्हणायची आई, 2 वर्षांपूर्वी झालं निधन
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Evergreen Rekha: सदाबहार अभिनेत्री रेखाने नुकतीच 'द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो' मध्ये हजेरी लावली होती. यावेळी अभिनेत्रीचा हटके अंदाज पहायला मिळाला. या एपिसोडमध्ये अभिनेत्रीने अनेक किस्से सांगितले आणि बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला.
advertisement
1/7

सदाबहार अभिनेत्री रेखाने नुकतीच 'द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो' मध्ये हजेरी लावली होती. यावेळी अभिनेत्रीचा हटके अंदाज पहायला मिळाला. या एपिसोडमध्ये अभिनेत्रीने अनेक किस्से सांगितले आणि बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला.
advertisement
2/7
अभिनेत्री रेखाने तिच्या मुलीविषयीदेखील सांगितलं. रेखाला आई म्हणणाऱ्या व्यक्तीविषयी सांगितलं आणि त्या संबंधित एक किस्साही शेअर केला. जो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
advertisement
3/7
कपिल शर्माने चाहत्यांना सांगितलं की रेखा खूप चांगली मिमिक्री करते. एखाद्या व्यक्तीचं काही वेळ निरिक्षण केल्यावर रेखा त्याची मिमिक्री करते असं कपिल म्हणाला. मग त्याने रेखाला दिवंगत गायक लता मंगेशकरांची मिमिक्री करायला सांगितली. त्यानंतर रेखाने त्यांच्याशी संबंधित एक खास किस्सा सांगितला.
advertisement
4/7
रेखाने सांगितलं की तिला नेहमीच लता मंगेशकरांसारखी मुलगी असावी असं वाटायचं. त्यांनी मला एका पार्टीमध्ये बोलावलं होतं. पार्टीमध्ये सगळ्या लोकांसमोर मी त्यांना म्हटलं होतं की, लता दीदी मी तुमची खूप मोठी फॅन आहे.
advertisement
5/7
रेखा पुढे म्हणाली, मी त्यांना म्हटलं जर देव माझं ऐकत असेल कर मला पुढच्या जन्मी तुमच्या सारखी मुलगी पाहिजे. यावर त्यांनी रिप्लाय दिला की पुढच्या जन्मी कशाला मी याच जन्मात तुमची मुलगी बनवते. आणि मग पार्टीत त्या मला आई आई आवाज देत होत्या.
advertisement
6/7
रेखाचा हा किस्सा ऐकून सर्वच चकित झाले. रेखाने सांगितलेला हा किस्सा सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
advertisement
7/7
दरम्यान, लता मंगेशकर यांचं 2022 च्या फेब्रुवारीमध्ये निधन झालं. त्या आज जरी या जगात नसल्या तरी त्यांची गाणी आणि त्यांची आठवण आजही चाहते काढत असतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Evergreen Rekha: कोण आहे रेखाची मुलगी? जी अभिनेत्रीला म्हणायची आई, 2 वर्षांपूर्वी झालं निधन