TRENDING:

IND-USA मॅच बघायला गेली अन् एका रात्रीत व्हायरल झाली, कोण आहे वानखेडे स्टेडियमवर आलेली तन्वी गडकरी?

Last Updated:
Who is Tanvi Gadkari : वानखेडे स्टेडियमवरील IND USA मॅचमध्ये एक मुलगी भारताला सपोर्ट करताना दिसली. तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. तन्वी गडकरी असं तिचं नाव आहे. ही मुलगी आहे कोण?
advertisement
1/9
IND-USA मॅच बघायला गेली अन् एका रात्रीत व्हायरल झाली, कोण आहे तन्वी गडकरी?
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या भारत विरुद्ध अमेरिका सामन्यादरम्यान टीम इंडियाच्या जर्सीमध्ये उत्साहाने नाचणारी एक मुलगी कॅमेऱ्यांनी कैद केली आणि ती रातोरात व्हायरल झाली.
advertisement
2/9
आता ही सुंदरी कोण आहे? असा प्रश्न लाखो लोकांना पडला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमधील मुलीचं नाव तन्वी गडकरी असं आहे. ही मराठमोळी मुलगी आहे तर कोण? पाहूयात. 
advertisement
3/9
सोशल मीडिया हे एक माध्यम आहे जे रात्रीतून कोणालाही प्रसिद्ध करू शकते. आजकाल एक नाव चर्चेत आहे आणि लोक ते गुगलवर शोधत आहेत ती म्हणजे तन्वी गडकरी. तिचा स्टेडियममधील उत्साह पाहून सगळेच अवाक् झालेत. 
advertisement
4/9
या सुंदरीचे नाव तन्वी गडकरी असं आहे.  ती स्वतः एक अभिनेत्री आहे. 7 फेब्रुवारी रोजी झालेल्या सामन्यादरम्यान तन्वी भारतीय संघाची जर्सी घालून स्टँडमध्ये बसली होती. कर्णधार सूर्यकुमार यादवने एक शानदार 'सुपला' शॉट मारला तेव्हा कॅमेरा तिच्यावर केंद्रित झाला. तन्वी उत्साहाने नाचताना दिसली. तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 
advertisement
5/9
व्हायरल क्लिपमध्ये तन्वी उत्साहाने टीम इंडियाला सपोर्ट करताना दिसत आहे.  तन्वीने स्वतः तिचा हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. स्टेडियममध्ये माझा पहिला क्रिकेट सामना पाहण्यासाठी गेले होते, मी टीव्हीवर नाचत असल्याचं दिसलं, असं म्हणत तन्वीने तिचा व्हिडीओ शेअर केला आहे.  
advertisement
6/9
तन्वी गडकरी ही एक अभिनेत्री, डान्सर आणि डिजिटल क्रिएटर आहे. इंस्टाग्रामवर तिचे चाहते खूप आहेत. तन्वीला इन्स्टाग्रामवर जवळपास 3 लाख 20 हजार लोक फॉलो करतात. ती तिच्या डान्स रील्स, लाइफस्टाइल पोस्ट आणि ब्रँड कोलॅबोरेशन तिथे शेअर करत असते. तिचे हॉट फोटो देखील चर्चेत येत असतात. 
advertisement
7/9
2023 मध्ये अमेझॉन मिनीटीव्हीवर रिलीज झालेल्या 'कॅम्पस बीट्स' या डान्स वेब सिरीजमुळे तन्वीला ओळख मिळाली. तिच्या रिहाना या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली.
advertisement
8/9
त्यानंतर ती 'जमनापार' मध्ये ख्याती राणाच्या भूमिकेत दिसली होती. तसंच 'पॉवर ऑफ पंच' मध्येही तिनं काम केलं आहे. 
advertisement
9/9
त्याचप्रमाणे तन्वी 'बन्सी' आणि 'दिल दुबडा जावे' सारख्या अनेक म्युझिकल व्हिडिओंमध्ये देखील दिसली आहे. तिचे डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर ट्रेंड होत असतात. 
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
IND-USA मॅच बघायला गेली अन् एका रात्रीत व्हायरल झाली, कोण आहे वानखेडे स्टेडियमवर आलेली तन्वी गडकरी?
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल